चाकणजवळ 17 वर्षीय तरुणीची हत्या, झुडपात विवस्त्र मृतदेह आढळला, अत्याचाराचा संशय

पुणे जिल्ह्यातील चाकण जवळील भामा-आसखेड धरण परिसरात, एका 17 वर्षीय तरुणीची निघृण हत्या करण्यात आली आहे. Chakan girl Murder

चाकणजवळ 17 वर्षीय तरुणीची हत्या, झुडपात विवस्त्र मृतदेह आढळला, अत्याचाराचा संशय

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण जवळील भामा-आसखेड धरण परिसरात, एका 17 वर्षीय तरुणीची निघृण हत्या करण्यात आली आहे. पीडितेचा मृतदेह विवस्त्रावस्थेत आढळला आहे. काल उशिरा ही घटना घडकीस आली. (Chakan girl Murder)

भामा-आसखेड परिसरात करंजविहिरे इथे 17 वर्षीय तरुणीची डोक्यात दगड घालून निघृण हत्या करण्यात आली. मृतदेह विवस्त्रावस्थेत झाडांमध्ये टाकण्यात आला होता. त्यामुळे या पीडित मुलीवर अतिप्रसंग करुन निघृण हत्या केल्याचा नातेवाईकांचा संशय आहे. नातेवाईकांनी याप्रकरणी चाकण पोलिसात तक्रार दाखल करुन, तिथेच ठाण मांडलं.

त्यामुळे पोलीस स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नराधम आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली.

याप्रकरणी तरुणीच्या हत्येच्या घटनेत काही संशयितांना चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील योग्य तो गुन्हा दाखल करण्यात येईल असे चाकण पोलिसांकडून सांगण्यात आले.

(Chakan girl Murder)

Published On - 4:07 pm, Sat, 25 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI