निर्भया बलात्कार प्रकरण : नराधमांची फाशी तिसऱ्यांदा टळली

निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषींची फाशी टळली (nirbhaya rape case) आहे. 

निर्भया बलात्कार प्रकरण : नराधमांची फाशी तिसऱ्यांदा टळली

नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांची फाशी पुन्हा टळली (nirbhaya rape case) आहे. दिल्लीच्या पटियाला कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे. पुढील आदेशापर्यंत दोषींना फाशी देण्यात येणार नाही, असा निर्णय पटियाला कोर्टाने दिला आहे. त्यामुळे निर्भया दोषींची फाशी तिसऱ्यांदा टळली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आज (2 मार्च) या प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता याची क्यूरेटिव याचिका फेटाळली होती. मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पवनची दया याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीवर स्थगिती दिली (nirbhaya rape case) आहे.

दोषी पवनने फाशीच्या शिक्षेला उशीर व्हावा या उद्देशाने शुक्रवारी (28 फेब्रुवारी) सायंकाळी क्यूरेटिव याचिका दाखल केली. यावर सर्वोच्च न्यायलयाने आज (2 मार्च) तात्काळ याचिका सुनावणीला घेत निकाली काढली. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून फाशीच्या अंमलबजावणीचा मार्ग जवळपास मोकळा केला होता.

मात्र पवनने 18 तासांपूर्वी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे. ही याचिका अद्याप प्रलंबित आहे. यामुळे दिल्लीच्या पटियाला कोर्टाने पुढील आदेशापर्यंत चारही आरोपींची फाशी स्थगित केली आहे. त्यामुळे उद्या (3 मार्च) सकाळी 6 वाजता निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषींची फाशी टळली (nirbhaya rape case) आहे.

दोन वेळा स्थगिती

निर्भया बलात्कार प्रकरणाच्या 7 जानेवारीला झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने चार आरोपींविरोधात डेट वॉरंट जारी केल होतं. त्यानुसार या चौघांना 22 जानेवारीला फासावर लटकवलं जाणार होतं. दोषी असलेल्या मुकेशने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यांकडे दया याचिकेची मागणी केली होती. मात्र राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

त्यानंतर 17 जानेवारीच्या सुनावणीदरम्यान चारही आरोपींविरोधात नवं डेथ वॉरंट जारी करण्यात आलं. या डेथ वॉरंटनुसार तिहार तुरुंगात चारही दोषींना 1 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता एकाच वेळी फाशी दिली जाईल, असा निर्णय दिल्ली कोर्टाने दिला होता.

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना शनिवारी 1 फेब्रुवारीला फासावर लटकवलं जाणार होतं. मात्र 31 जानेवारीला निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांच्या फाशीवर अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्यात आली. पुढच्या आदेशापर्यंत ही फाशी रद्द करण्यात आली आहे, असे दिल्ली कोर्टाने सुनावणीदरम्यान सांगितलं. या कारणामुळे दुसऱ्यांदा नराधमांची फाशी (nirbhaya rape case) टळली.

निर्भया बलात्कार प्रकरण

16 डिसेंबर 2012 रोजी 6 नराधमांनी निर्भयावर गँगरेप केला होता. या प्रकाराने संपूर्ण देश हादरला होता. या पाशवी बलात्कारानंतर निर्भयाची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. नऊ महिन्यांनंतर सप्टेंबर 2013 मध्ये कनिष्ठ कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI