भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या KTM च्या ‘या’ बाईकचं पुढील व्हर्जन लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

KTM 125 ड्युक (KTM 125 Duke) ही बाईक नव्या डिझाईनसह भारतात 2021 मध्ये लाँच केली जाणार आहे.

भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या KTM च्या 'या' बाईकचं पुढील व्हर्जन लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 6:08 PM

मुंबई : KTM 125 ड्युक (KTM 125 Duke) ही बाईक नव्या डिझाईनसह भारतात 2021 मध्ये लाँच केली जाणार आहे. त्यासाठी कंपनी पूर्णपणे सज्ज आहे. ही बाईक नुकतीच डीलरशिपकडे पाहायला मिळाली आहे. KTM 125 ड्युक स्पोर्ट्स ही बाईक 2012 मध्ये पहिल्यांदा भारतात पाहायला मिळाली होती. आता या बाईकच्या नव्या व्हर्जनचे बुकिंग सुरु करण्यात आलं आहे. नवी KTM 125 Duke स्पोर्ट्स बाईक तुम्ही अवघ्या 5000 रुपयांच्या टोकन अमाऊंटवर बुक करु शकता. (2021 KTM 125 Duke With New Design Spied At A Dealership)

केटीएमने 125 Duke च्या डिझाईनमध्ये फार बदल केलेले नाहीत. ही बाईक 200 Duke सारखीच दिसेल. तुम्ही ही बाईक कलर थीम आणि डीकॅल्सच्या आधारावर ओळखू शकता. कंपनीने बाइकमध्ये व्हाईट फ्युल टँक आणि बोल्ड ऑरेंज एक्सटेन्शन दिलं आहे. याद्वारे कंपनी देशातील तरुणांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. मुळात ही बाईक तरुणांसाठी डिझाईन करण्यात आली आहे. परंतु इतर स्पर्धकांना जोरदार टक्कर देण्यासाठी कंपनीने बाईकमध्ये काही बदल केले आहेत. दरम्यान असे सांगिले जात आहे की, ही बाईक अधिकृतरित्या लाँच होईपर्यंत अनेक वेगवेगळ्या रंगांमधील या बाईकचे व्हेरियंट्स आपल्यासमोर येतील.

नव्या केटीएम 125 Duke मध्ये 13.4 लीटरचा फ्युल टँक असू शकतो. ज्यामुळे बाईकचं कर्व्ह वेट वाढेल. दरम्यान या बाईकचे जे फोटोज लिक झाले आहेत, त्यावरुन अंदाज बांधला जातोय की, 2021 KTM 125 Duke मध्ये ड्युक 200 चं अपग्रेडेड चेसिस असू शकतं, जे एक स्टील ट्रेलिस युनिट आहे, आणि त्याच्या रियर सब-फ्रेममध्ये बोल्डचा वापर केला जातो.

ही बाईक 124cc सिंगल सिलेंडर लिक्विड कुल्ड इंजिनसह येते. हे इंजिन 14.3 bhp आणि 12nm टॉर्क जनरेट करु शकतं. यामध्ये तुम्हाला 6 स्पीड गियरबॉक्स मिळेल. बाइकमध्ये पुढच्या बाजूला USD फॉर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक असतील. पुढे किंवा मागे डिस्क ब्रेक्स देण्यात आलेले नाहीत. ही मोटारसायकल सिंगल चॅनल एबीएससह मिळेल.

केटीएमची 125cc बाईक भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. 2018 पासून आतापर्यंत ही बाईक देशातील सर्वाधिक विक्री झालेली बाईक ठरली आहे. नव्या केटीएम 2021 125 ड्युकची किंमत 1.5 लाख रुपये असू शकते, जुन्या ड्युकपेक्षा ही बाईक 8000 रुपयांनी महाग आहे.

संबंधित बातम्या 

Alert! तुमच्या गाडीवर त्वरित हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावून घ्या, अन्यथा ‘ही’ कामे करता येणार नाहीत

बाईकप्रेमींसाठी खुशखबर, पुढच्या वर्षी बाजारात येणार ही शानदार बाईक, कंपनीकडून बुकिंग सुरु

जुनी दुचाकी द्या आणि नवी Hero Electric स्कूटर घेऊन जा, ‘या’ कंपनीची एक्सचेंज ऑफर

(2021 KTM 125 Duke With New Design Spied At A Dealership; Launch Soon)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.