AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 21 वर्षाचा गुप्तहेर, पाकिस्तानी स्पाय बीएसएफला सापडला!

चंदीगड: पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या सर्व सीमांवर कडक पहारा आहे. अशावेळी भारतीय सुरक्षारक्षकांनी पंजाबच्या फिरोजपूरमध्ये एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पकडलेला संशयित हा पाकिस्तानी स्पाय अर्थात गुप्तहेर असल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा गुप्तहेर अवघ्या 21 वर्षांचा असून, तो उत्तर प्रदेशातील मुरादाबादचा रहिवासी आहे. मोहम्मद शाहरुख असं या संशयित गुप्तहेराचं नाव […]

अवघ्या 21 वर्षाचा गुप्तहेर, पाकिस्तानी स्पाय बीएसएफला सापडला!
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

चंदीगड: पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या सर्व सीमांवर कडक पहारा आहे. अशावेळी भारतीय सुरक्षारक्षकांनी पंजाबच्या फिरोजपूरमध्ये एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पकडलेला संशयित हा पाकिस्तानी स्पाय अर्थात गुप्तहेर असल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा गुप्तहेर अवघ्या 21 वर्षांचा असून, तो उत्तर प्रदेशातील मुरादाबादचा रहिवासी आहे. मोहम्मद शाहरुख असं या संशयित गुप्तहेराचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. या संशियत गुप्तहेराकडे मोठ्या प्रमाणात संशयित साहित्य सापडलं आहे.

संशयिताचं पाकिस्तान कनेक्शन बीएसएफने ज्या संशयिताला फिरोजपूर बॉर्डरवरुन पकडलं आहे, त्याचं पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्याजवळ एक मोबाईल फोन आणि त्यामध्ये पाकिस्तानचं सिम सापडलं आहे. इतकंच नाही तर त्यामध्ये पाकिस्तानातील 6 वेगवेगळे नंबर सापडले आहेत. सध्या बीएसएफने त्याला ताब्यात घेतलं आहे. पाकिस्तानी सिमकार्ड मिळाल्यामुळे त्याच्यावरील संशय वाढला आहे.

आजही हायअलर्ट दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या सीमांवर हायअलर्ट आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे गेल्या 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली. या हल्ल्यानंतर भारताने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करुन शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या हवाई हद्दीत विमाने घुसवून, बॉम्ब फेकले. मात्र भारताने त्यांचं F16 हे विमान पाडलं. त्यानंतरही पाकच्या कुरापती सुरु असल्याने भारतातील महत्त्वाच्या शहरात हायअलर्ट आहे.

मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.
शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश
शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश.
धर्माबादमध्ये मतदाराना मंगल कार्यालयात डांबलं, पैसे वाटपापूर्वीच पळापळ
धर्माबादमध्ये मतदाराना मंगल कार्यालयात डांबलं, पैसे वाटपापूर्वीच पळापळ.
कोण उधळणार गुलाल? 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींचा निकाल पाहा एका क्लिकवर
कोण उधळणार गुलाल? 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींचा निकाल पाहा एका क्लिकवर.
VIDEO: BJP आमदारानं रिक्षाचालकाच्या लगावली कानशिलात, नेमकं घडलं काय?
VIDEO: BJP आमदारानं रिक्षाचालकाच्या लगावली कानशिलात, नेमकं घडलं काय?.
Epstein files सार्वजनिक अन् खळबळ; एपस्टिन, मोदी भेटले! चव्हाणांचा दावा
Epstein files सार्वजनिक अन् खळबळ; एपस्टिन, मोदी भेटले! चव्हाणांचा दावा.