Lockdown : लॉकडाऊन पक्ष्यांच्या जीवावर, अन्न पाण्यावाचून 25 ते 30 कावळ्यांचा मृत्यू

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Crow death due to lockdown) आहे.

Lockdown : लॉकडाऊन पक्ष्यांच्या जीवावर, अन्न पाण्यावाचून 25 ते 30 कावळ्यांचा मृत्यू


उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Crow death due to lockdown) आहे. लॉकडाऊननंतर अनेक मजूर रस्त्यावर आले, त्यासोबत फुटपाथवर राहणाऱ्या गरिबांचेही जेवणाचे हाल झाले आहेत. या लॉकडाऊनचा फटका आता पक्षांनाही बसत असल्याचे समोर आले आहे. उल्हासनगरच्या चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये 25 ते 30 कावळे अन्न, पाणी न मिळाल्याने मृत झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला (Crow death due to lockdown) जात आहे.

कॉलेज कॅम्पसमध्ये दररोज कावळे मृत पावत असल्याचे कॉलेजच्या सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. उल्हासनगर शहरात हातच्या बोटावर मोजण्या इतक्या ठिकाणी घनदाट वृक्ष आहेत. त्यापैकी हे कॉलेज आहेत, या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये देखील मोठं मोठी वृक्ष असल्याने अनेक प्रजातीचे पक्षी, चिमण्यांचा किलबिलाट असतो. मात्र लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून हे कॉलेज बंद आहे. त्यामुळे याठिकाणी कोणतीही वर्दळ नाही. परिणामी कावळ्यांना अन्न, पाणी न मिळाल्याने त्यांचा मृत्यू होत आहे, असे सुरक्षा रक्षकाचे म्हणणे आहे.

लॉकडाऊनमध्ये तर आता आणखी 16 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. हा लॉकडाऊन आता 30 एप्रिलपर्यंत असणार आहे. त्यामुळे या लॉकडाऊनचा फटका पक्षांना बसू शकतो. यावर पशुसंवर्धन विभाग काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस देशासह राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. देशात आतापर्यंत साडे सहा हजार कोरोनाबाधित आढळले आहेत. तर राज्यात 1700 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI