नव्या कोरोनाचे देशात आणखी पाच रुग्ण, आतापर्यंत 25 बाधितांची नोंद

भारतात आज कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित झालेले पाच नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नव्या स्ट्रेनने बाधित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 25 वर गेली आहे.

नव्या कोरोनाचे देशात आणखी पाच रुग्ण, आतापर्यंत 25 बाधितांची नोंद
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 5:04 PM

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या रुपातील कोरोना विषाणूमुळे (Corona New Strain) जगभरातील देशांची पुन्हा झोप उडाली आहे. नवे रंगरुप घेऊन आलेला कोरोनाचा हा नवा अवतार पूर्वीच्या विषाणूपेक्षा भयंकर आहे. भारतात आज कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित झालेले पाच नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ब्रिटनहून भारतात आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 25 वर गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती नुकतीच जाहीर केली आहे. (5 new cases of UK covid strain traced in india overall 25 infected)

नव्या कोरोनामुळे संक्रमित (Infection) झालेल्या पाचपैकी चार प्रकरणं पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (NIV) आणि दिल्लीच्या सीएसआयआर-इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीने उघडकीस आणली आहेत. या सर्व रुग्णांना स्टेट हेल्थ फॅसिलिटीजनुसार फिजिकल आयसोलेशनमध्ये (Isolation) ठेवण्यात आले आहे.

ब्रिटनहून परतणाऱ्या 25 लोकांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची बाधा

आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ब्रिटनहून भारतात आलेल्या 25 जणांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. NIV पुणे आणि IGIB दिल्लीने या प्रकरणांचा तपास केला आहे. सध्या या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दिल्लीत कर्फ्यू

राजधानी दिल्लीतही (New Delhi) कोरोनाच्या नव्या अवताराचे 8 रुग्ण मिळाले आहेत. अशा परिस्थितीत दिल्ली सरकारने 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला संभाव्य गर्दी लक्षात घेता आज आणि उद्या (31 डिसेंबर आणि 1 जानेवारी) रात्री 11 ते सकाळी 6 या काळात दिल्लीत कर्फ्यू (Curfew) लावला आहे. दिल्लीतील अनेक लोकप्रिय ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताला भल्या पहाटे लोक गर्दी करु शकतात. तसंच 31St ला ही काही उत्साही मंडळी मध्यरात्री घराच्या बाहेर पडून अनावश्यक गर्दी करु शकतात. हीच पार्श्वभूमी लक्षात घेता सरकारने आज आणि उद्या रात्री 11 ते सकाळी 6 दिल्लीत कर्फ्यू लावला आहे.

ब्रिटनमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांवर बंदी

ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या अवताराची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर केंद्र सरकारने लगोलग निर्णय घेत 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटनमधून येणाऱ्या तसंच जाणाऱ्या विमान सेवेवर बंदी घातली होती. ही बंदी 7 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरची अंशतः बंदीदेखील अजून एक महिन्याने वाढवली आहे. नव्या वर्षातल्या पहिल्या महिन्यावरही कोरोनाचे सावट कायम आहे. ‘वंदे भारत’ अंतर्गत काही ठराविक रुटवर विमानसेवेस परवानगी आहे.

अंध्र प्रदेशमध्ये हाय अलर्ट

नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वेगवेगळ्या राज्यांनी खबरदारी घेणे सुरु केलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर तेथील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनहून परतेलेल्या 1,423 पैकी 1,406 नागरिकांना ट्रेस करण्यात आलं आहे.

हे ही वाचा

कोरोनाचा नवा अवतार देशातील 36 कोटी लहान मुलांसाठी धोकादायक, वाचा कसा?

कोरोनावरील लस ब्रिटन आणि द. आफ्रिकेत आढळलेल्या नव्या स्ट्रेनवरही प्रभावी : आरोग्य मंत्रालय

(5 new cases of UK covid strain traced in india overall 25 infected)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.