बीडच्या आरोग्य विभागातील आयुक्त, संचालकांसह 8 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

न्यायालयाच्या आदेशाने आरोग्य विभागाचे आयुक्त, २ संचालकांसह 8 अधिकाऱ्यांवर मंगळवारी बीड शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

बीडच्या आरोग्य विभागातील आयुक्त, संचालकांसह 8 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 8:25 PM

बीड : बीडच्या कार्यालयीन अधीक्षकाच्या निवृत्ती लाभातून सव्वातीन लाखांची रक्कम कपात केल्याचे एक प्रकरण आरोग्य विभागातील बड्या अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. यात न्यायालयाच्या आदेशाने आरोग्य विभागाचे आयुक्त, २ संचालकांसह 8 अधिकाऱ्यांवर मंगळवारी बीड शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने राज्यात खळबळ उडाली आहे.(A case of atrocity has been registered against senior officials in Beed)

नेमकं प्रकरण काय?

विठ्ठल शंकरराव लोखंडे हे जिल्हा रुग्णालयात कार्यालयीन अधीक्षक पदावरून ३० एप्रिल 2013 रोजी निवृत्त झाले होते. त्यांच्या कार्यकाळातील विद्युत देयकाच्या रुपातील 3 लाख 24 हजार रुपये रक्कम भरली नसल्याचे सांगत, ती रक्कम त्यांच्या निवृत्तीनंतरच्या लाभातून कपात केली होती. याबाबत त्यांनी आयुक्तांपर्यंत धाव घेतली. परंतु कोणीच दखल घेतली नाही. अखेर त्यांनी वैतागून न्यायालयात धाव घेतली. बीडच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आरोग्य विभागातील संचालक, आयुक्तांसह 8 अधिकाऱ्यांवर ३(१)(पी)(क्यू) ॲट्रॉसिटी व भा.दं.वि. कलम 177, 182 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

कोणते उच्च पदस्थ अधिकारी अडकणार पिंजऱ्यात?

14 मे 2013 ते 23 ऑक्टोबर 2019 या काळात जेवढे अधिकारी कार्यरत होते, त्या सर्वांवर गुन्हा नोंद झाला आहे. यात लातूरचे उपसंचालक, लातूरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डी. एन. मोरे, बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक, बीडचे मुख्य प्रशासकीय अधिकारी, लातूरचे कार्यालयीन अधीक्षक व्ही. सी. बावसकर, मुंबईचे संचालक, पुण्याचे संचालक, आरोग्य विभागाचे आयुक्त यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

पोलिसांची दमछाक होणार!

दरम्यान, या प्रकरणात आरोपींचा शोध घेताना पोलिसांची चांगलीच धावपळ होण्याची शक्यता आहे. कारण, 14 मे 2013 ते 23 ऑक्टोबर 2019 या काळात गुन्हा दाखल झालेल्या पदांवर किती आणि कोणते अधिकारी होते, याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. ते नावं शोधून त्यांना अटक करेपर्यंत मोठा कालावधी जाणार आहे. तोपर्यंत आरोपींकडून जामीन मिळवण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, या प्रकरणात बड्या अधिकाऱ्यांची नावं आल्यानं आरोग्य विभागाकडून पोलिसांना किती सहकार्य मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

पंकजा मुंडे यांच्या कारखान्यात चोरी! किती लाखाचं साहित्य लंपास?

ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये ‘गोडवा’, पंकजा-धनंजय मुंडे 1 वर्षानंतर एकत्र

A case of atrocity has been registered against senior officials of Beed’s health department

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.