AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ira Khan | नव्या नात्यामुळे आमिर खानची लेक पुन्हा चर्चेत, कोण आहे इरा खानचा हा नवा बॉयफ्रेंड?

बॉलीवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याची मुलगी इरा खान (Ira Khan) नेहमीच वेगवेगळ्या चर्चेत असते. इराने काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक खुलासा केला होता.

Ira Khan | नव्या नात्यामुळे आमिर खानची लेक पुन्हा चर्चेत, कोण आहे इरा खानचा हा नवा बॉयफ्रेंड?
| Updated on: Nov 25, 2020 | 2:52 PM
Share

मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याची मुलगी इरा खान (Ira Khan) नेहमीच वेगवेगळ्या चर्चेत असते. इराने काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. मात्र, यावेळी इरा वेगळ्याच विषयावरून चर्चेत आली आहे. इराला नवा बॉयफ्रेंड मिळाल्याची बातमी आहे. नुपूर शिखरे असे त्याचे नाव असून तो आमिर खानचा फिटनेस कोच आहे. नुपूरने त्याचा आणि इराचा फोटो शेअर केला आहे. तो फोटो दिवाळीचा असल्याचे म्हटलं जात आहे. या फोटोत हे दोघेही एकमेकांबरोबर खूश दिसत आहेत. (Aamir Khan’s daughter Ira Khan in the spotlight due to a new relationship)

इराने कुटुंबीयांसमोर नूपूरवरील आपले प्रेम जाहीर केल्याची चर्चा आहे. आई रीना दत्तालाही त्याची ओळख इराने करुन दिली आहे. इराचा बॉलिवूडमध्ये काम करण्याचा कुठलाही प्लॅन नसल्याचे अगोदरच स्पष्ट केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Popeye ⚓ (@nupur_shikhare)

नुपूर फिटनेस तज्ज्ञ असून तो सुष्मिता सेनचा वैयक्तिक कोच देखील आहे. त्याचबरोबर तो फिटनेसबाबत आमिर खानला सतत सल्लाही देत असतो. इराने आणि नुपूरने आमिर खानच्या महाबळेश्वरच्या फॉर्म हाऊसमध्ये यावर्षी दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांचे काही मित्रही त्यांच्यासोबत होते. काही दिवसातच दोघेही आपल्या नात्याबाबत खुलासा करतील अशी चर्चा आहे. ‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपट पाहण्यासाठी इरा ही वडील आमिर खानसोबत गेल्या आठवड्यात मुंबईतील जुहू पीव्हीआरला गेली होती. काही दिवसांपूर्वीच ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या निमित्ताने इराने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यावेळी तिने आपण डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून इरा खान चर्चेत आहे. दरम्यान, इराने शेअर केलेल्या नव्या व्हीडिओत तिने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मी डिप्रेशनमध्ये जावे, असे काहीच माझ्या आयुष्यात घडले नव्हते. मात्र, तरीही मला नैराश्य आले.

अनेकजण मला याबाबत विचारतात, पण मी त्याचे कारण सांगू शकत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी स्वत: याचे कारण जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे. आयुष्यात मला कधी पैशांची कमी भासली नाही. माझ्याकडे एक सपोर्ट सिस्टीम आहे. माझे आई-वडील, मित्रमैत्रिणींनी कोणत्याही गोष्टीसाठी माझ्यावर दबाव आणला नाही. माझ्या आयुष्यात काहीही घडले तर ते मी माझ्या आई-वडिलांना सांगू शकते, असे इराने या व्हिडीओत म्हटले होते. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होता. लक्षवेधी बाब म्हणजे तिने हा व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनेलवर हिंदी डबिंग

संबंधित बातम्या :

बालपणी माझे लैंगिक शोषण झाले होते; आमिर खानच्या मुलीचा खळबळजनक खुलासा

त्या’ व्हिडीओवरून ट्रोल; आमिरची कन्या नेटकऱ्यांवर भडकली

(Aamir Khan’s daughter Ira Khan in the spotlight due to a new relationship)

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.