भाजप आमदाराचा प्लाझ्मादानाचा निर्धार, कोरोनामुक्त होताच घोषणा

Nupur Chilkulwar

|

Updated on: Jul 19, 2020 | 4:26 PM

रुग्णालयातून बाहेर पडताच अभिमन्यू पवार यांनी प्लाझ्मादान करणार असल्याचं जाहीर केलं.

भाजप आमदाराचा प्लाझ्मादानाचा निर्धार, कोरोनामुक्त होताच घोषणा

लातूर : भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी कोरोनावर (Abhimanyu Pawar Announce To Donate Plasma) मात केली आहे. रुग्णालयातून बाहेर पडताच अभिमन्यू पवार यांनी प्लाझ्मादान करणार असल्याचं जाहीर केलं. अभिमन्यू पवार हे लातूरमधील औसा मतदारसंघाचे आमदार आहेत. दहा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होता. तसेच, त्यांचा पुत्र परिक्षीत यालाही कोरोनाचा संसर्ग झाला होता (Abhimanyu Pawar Announce To Donate Plasma).

अभिमन्यू पवार आणि त्यांच्या मुलगा कोरोनातून बरा झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिमन्यू पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी प्लाझ्मादान करणार असल्याचं सांगितलं. तसेच, उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेल्या लोकांनाही प्लाझ्मादान करण्याचं आवाहन केलं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अभिमन्यू पवारांच्या मुलासह सात जण प्लाझ्मादान करणार

या आवाहनाला प्रतिसाद देत आता आमदार अभिमन्यू पवार यांचा मुलगा परीक्षित आणि इतर सात जण लातूरच्या विलासराव देशमुख आरोग्य विज्ञान संस्थेत आपला प्लाझ्मादान करणार आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या शरीरात निगेटिव्ह झाल्यानंतर रक्तघटक आणि द्रवामध्ये ज्या अँटीबॉडीज तयार होतात. त्या इतर पॉझिटिव्ह रुग्णांना देता येतात, त्याला प्लाझ्मा म्हणतात. विशेष म्हणजे प्लाझ्मा दान करण्यासाठी निगेटिव्ह झालेल्या रुग्णाला किमान 28 दिवसांचा कार्यकाळ व्हावा लागतो (Abhimanyu Pawar Announce To Donate Plasma).

प्लाझ्मा थेरेपी म्हणजे काय?

प्लाझ्मा हा एक पिवळसर रंगाचा द्रव्य घटक आहे. हा आपल्या रक्तातील पेशींना संपू्र्ण शरीरात प्रवाहित करण्याचं काम करतो. तो रक्ताच्या 55 टक्के असतो. प्लाझ्मा हा रुग्णांना योग्य प्रमाणात दिल्याने शरीरात अँटीबॉडी तयार होतात. ही अँटीबॉडीज फक्त संसर्ग झालेल्या लोकांपासूनच तयार केल्या जाऊ शकतात.

कोविड-19 पासून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत, ज्या या विषाणूला नष्ट करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असतात. याला कॉन्व्हुलसंट प्लाझ्मा थेरपी (Convulsant Plasma Therapy) असं म्हणतात. या थेरेपीचा वापर पहिल्यांदा 1918 मध्ये स्पॅनिश फ्लू महामारीवेळी करण्यात आला होता.

Abhimanyu Pawar Announce To Donate Plasma

संबंधित बातम्या :

BJP MLA Abhimanyu Pawar Corona | भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची लागण, मुलालाही संसर्ग

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI