लिफ्टच्या बहाण्याने अल्पवयीन तरुणीला किस, आरोपी 5 महिन्यांनी कल्याणमध्ये जेरबंद

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला किस करुन पळून गेलेल्या आरोपीला तब्बल पाच महिन्यांनी खडकपाडा पोलिसांनी अटक केली. (accused arrested  in Mumbai kissing a minor under the pretext of giving her lift) 

लिफ्टच्या बहाण्याने अल्पवयीन तरुणीला किस, आरोपी 5 महिन्यांनी कल्याणमध्ये जेरबंद
Follow us
| Updated on: Oct 04, 2020 | 11:06 PM

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अल्पवयीन तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने किस करुन पळून गेलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तब्बल पाच महिन्यांनी खडकपाडा पोलिसांनी या लफंग्याला बेड्या ठोकल्या आहेत. अफसर शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मे महिन्यात रस्त्यावरुन जाताना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीला किस केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. (accused arrested  in Mumbai kissing a minor under the pretext of giving her lift)

सध्या बलात्कारासारख्या घटनांनी देश हादरुन जात आहे. विनयभंगासारखे गुन्हे तर रोजच घडताना दिसतात. अशातच लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन तरुणीला किस केल्याचा आरोप असलेल्या लफंग्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीच्या म्हणण्यानुसार, पाच महिन्यांपूर्वी आरोपी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला किस करुन पळून गेला होता. पोलिसांनी प्रकरणाच्या खोलात जाऊन आरोपीला पकडल्याने तरुणीच्या कुटुंबियांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.

मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद होती. अशा वातावरणात महत्त्वाच्या कामासाठी 14 मेला तरुणी रस्त्यावरुन जात होती. तरुणी एकटी असल्याचे दिसताच आरोपीने तरुणीला लिफ्ट देण्याचे आमिष दाखवले. अल्पवयीन तरुणी मनात कुठलीही शंका न ठेवता त्याच्या दुचाकीवर बसली. तरुणी शहाड परिसरात उतरण्याच्या बेतात असताना आरोपीने तिला किस करण्याचा प्रयत्न केला.

‘त्या’ फोनकॉलमुळे आरोपीला पकडण्यात यश

मुलीवर विनयभंगाचा प्रकार घडल्यानंतर आरोपीने मुलीच्या घरी फोन केला होता. फोनच्या मदतीने पोलीस अधिकारी किरण वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला अटक केली. कोळसेवाडी पोलिसांनी सिमकार्डच्या मदतीने आरोपीचं लोकेशन ट्रेस केलं. तसेच तरुणीने केलेल्या वर्णनावरुन आरोपीला पकडण्यात आले. अफसर शेख असे आरोपीचे नाव असून पोलीस मागच्या पाच महिन्यांपासून त्याच्या शोधात होते. खडकपाडा पोलिसांनी अफसर अटक करुन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येत आहे. अश्रफ शेख हा कल्याण पूर्वेतील आनंदवाडी परिसरात राहायचा.

संबंधित बातम्या :

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा

पुण्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग, आरोपी वॉर्डबॉयला अटक

कोल्हापूर विनयभंग प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करा, निलम गोऱ्हेंची मागणी

(accused arrested  in Mumbai kissing a minor under the pretext of giving her lift)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.