Vijay Raaz | दुसरी बाजू जाणून न घेता आरोपी ठरवले, छेडछाडीच्या आरोपांवर विजय राज यांची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता विजय राज (Vijay Raaz) यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर (Molestation allegation) अखेर मौन सोडले आहे.

Vijay Raaz | दुसरी बाजू जाणून न घेता आरोपी ठरवले, छेडछाडीच्या आरोपांवर विजय राज यांची प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विजय राज (Vijay Raaz) यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर (Molestation allegation) अखेर मौन सोडले आहे. माझी स्वतःची 21 वर्षांची मुलगी आहे. मी नेहमीच स्र्त्रीयांचा सन्मान केला आहे. दुसरी बाजू जाणून न घेताच समाजाने मला आरोपी घोषित केले आहे, असे विजय राज म्हणाले. मागील आठवड्यात त्यांच्या आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाच्या सेटवरील एका क्रू-मेंबरने छेडछाडी केल्याचा आरोप लावला होता. यानंतर विजय राज यांना गोंदियातून अटक करण्यात आली होती. या संदर्भात त्यांनी एका वृत्तपत्राला प्रतिक्रिया दिली (Actor Vijay Raaz Reacted on Molestation allegation).

‘शेरनी’ चित्रपटाचे सर्व कलाकार आणि स्टाफ हे गोंदियातील प्रसिद्ध हॉटेल ‘गेटवे’ येथे काही दिवसांपासून वास्तव्यास आहेत. चित्रिकरणादरम्यान आणि हॉटेलमध्ये अभिनेता विजय राज यांनी आपली छेड काढल्याचे पीडित तरुणीने म्हटले आहे. युवतीची छेड काढल्याच्या तक्रारीवरून गोंदियातील रामनगर पोलीसांनी विनयभंग केल्याप्रकरणी कलम 354 (अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन 2 नोव्हेंबर रोजी विजय राज यांना अटक केली होती. मात्र, 10 नोव्हेंबर रोजी त्यांना सशर्त जामीन मंजूर करत, सोडण्यात आले होते.

चित्रपटातून हकालपट्टी

विजय राजच्या या प्रकरणानंतर चित्रपटाची बदनामी नको व्हायला, असे कारण देत निर्मात्यांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. निर्मात्यांना चित्रपट तयार होण्यापूर्वी कुठलेही वाद निर्माण करायचे नाहीत. म्हणूनच इतके कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. तसे, आता त्याच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागणार असल्याचेदेखील म्हटले जात आहे. यावरही विजय राज यांनी प्रतिक्रिया दिली.

‘मुंबईला परतल्यावर मला ‘शेरनी’च्या निर्मात्यांचा मेल आला. या मेलमध्ये सदर प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मला या चित्रपटातून काढण्यात येत असल्याचे म्हटले होते. चित्रपटाच्या निर्मात्यांनीदेखील या चौकशी करता एका समिती नेमली आहे. या प्रकारचा मला खूप मोठा धक्का बसला आहे. माझ्या करिअरवर याचा परिणाम झाला आहे. दुसरी बाजू जाणून न घेता मला थेट आरोपी बनवण्यात आले आहे. याचा त्रास माझ्यासह मुलीला आणि वडिलांनादेखील झाला आहे’, असे म्हणत विजय राज यांनी आपली बाजू मांडली (Actor Vijay Raaz Reacted on Molestation allegation).

माझे खूप नुकसान झाले…

विजय राज म्हणतात, ‘मी गेल्या एका वर्षापासून या क्रूबरोबर काम करत होतो. आम्ही सेटवर क्रिकेट खेळायचो. आम्ही सगळे असेच एकत्र राहत होतो. तरीही जेव्हा मला ती माझ्यासोबत काम करण्यास कम्फर्टेबल नाही हे कळले, तेव्हा मी माफी देखील मागितली. हे सर्व इतर सहकाऱ्यांसमोर घडले. माझ्या माफीचा अर्थ असा आहे की मला तुमच्या भावना समजल्या. पण, याचा अर्थ असा नाही की, पोलीस स्थानकात दाखल केलेले आरोप मी स्वीकारले. मी माफी मागितली याचा अर्थ असा नाही की मी चुकीचा आहे.’

‘मी भावनांना महत्त्व देतो म्हणून माफी मागितली होती. मात्र, लोक कोणतीही तपासणी न करता गोष्टींच्या निष्कर्षापर्यंत पोहोचले तर माझी इतक्या वर्षांची मेहनत वाया जाईल. सत्य अजून समोर आलेले नाही, मात्र माझे खूप नुकसान झाले आहे. पुढील चौकशीत मी माझे पूर्ण सहकार्य देणार आहे. सत्य लवकरच समोर येईल’, असे देखील विजय राज म्हणाले.

(Actor Vijay Raaz Reacted on Molestation allegation)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI