मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी गेले काही दिवस चर्चेत आहे. पण आता दिशा पटानी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण दिशाचे कौतुक करत आहे.
आपल्या सर्वांना माहित आहे दिशा पटानी आपल्या फिटनेसची खूप काळजी घेते. दिशाला फिटनेस फ्रीकही म्हटलं जाते. दिशा नेहमी आपल्या सोशल अकाऊंट्सवर वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करत असते. ज्यामध्ये ती कधी फ्लायिंग किक, बॅक फ्लिप्स आणि इतर अनेक प्रकार करत असते.
दिशाने शेअर केलेल्या नव्या व्हिडीओमध्ये तिने आपल्या ट्रेनिंग दरम्यान, सिंगल हँडिंड कार्टव्हील करताना दिसत आहे. दिशा पटानीचा हा व्हिडीओ अनेकांना खूप आवडला आहे. या व्हिडीओवर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे.
View this post on InstagramTraining after ages with my trainer @nadeemakhtarparkour88 @flyzonefitness_ ??❤️
इन्स्टाग्रामवर दिशा पटानीला 22.2 मिलियन लोक फॉलो करतात. दिशा आपल्या फॉलोअर्ससाठी नेहमी बोल्ड आणि सुंदर फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. दिशाने काही दिवसांपूर्वी आपला 27 वा वाढदिवसही साजरा केला होता. नुकतेच ती सलमानच्या ‘भारत’ चित्रपटात दिसली होती.