VIDEO : मिथिला पालकरचा धमाकेदार डान्स व्हिडीओ व्हायरल, आतापर्यंत 14 लाख व्ह्यूज

बॉलिवूड अभिनेत्री मिथिला पालकरचा एका डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Mithila Palkar dance video).

VIDEO : मिथिला पालकरचा धमाकेदार डान्स व्हिडीओ व्हायरल, आतापर्यंत 14 लाख व्ह्यूज

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मिथिला पालकरचा एका डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Mithila Palkar dance video). मिथिला नेहमी इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक डान्स व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर हा डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे (Mithila Palkar dance video).

या व्हिडीओमध्ये मिथिला टीन नॉच youtuber Nicol Concessao सोबत डान्स करताना दिसत आहे. Little Things च्या काव्याचा हा डान्स व्हिडीओ तिच्या चाहत्याने खूप आवडलेला आहे. या व्हिडीओमध्ये मैथिली आणि निकोल दोघी प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंहचे गाणे ‘बन ठन चली देखो’ वर free style डान्स करत आहेत.

डान्स दरम्यान मिथिलाची सुंदर स्माईल सर्वांचे मन जिंकून घेत आहे. या व्हिडीओला नवरात्री टच देऊन दोघींनी ripped jeans आणि snikkers सोबत गुजराती स्टाईलचा क्रॉप टॉप घातलेला आहे. मिथिलाचा हा indo-western स्टाईल तिला सूट होत आहे. तिच्या व्हिडीओला आतापर्यंत 14 लाख 41 हजार पेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे.

संबंधित बातम्या :

Drug Connection | अर्जुन रामपालचा मेहुणा एनसीबीच्या ताब्यात, ड्रग्ज प्रकरणी चौकशी होणार!

Payal Ghosh | पायल घोषची ‘टीवटीव’ पुन्हा सुरू, रिचा चड्ढाच्या वकिलावर नवा आरोप!

Published On - 9:30 am, Tue, 20 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI