कोल्हापूर आणि सांगीलीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून पुन्हा लॉकडाऊनची मागणी

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने तेथील व्यापाऱ्यांनी पुन्हा लॉकडाऊनची मागणी केली (Lockdown in Kolhapur and Sangli) आहे.

कोल्हापूर आणि सांगीलीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून पुन्हा लॉकडाऊनची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने तेथील व्यापाऱ्यांनी पुन्हा लॉकडाऊनची मागणी केली (Lockdown in Kolhapur and Sangli) आहे. पुन्हा लॉकडाऊनसाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत प्रशासनाला निवेदनही दिले आहे. राज्य सरकारच्या पातळीवर लॉकडाऊनबाबत चाचपणी सुरु आहे. येत्या दोन दिवसात यावर निर्णय होऊ शकतो (Lockdown in Kolhapur and Sangli).

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचा विचार व्यापाऱ्यांनी केला आहे. कडक लॉकडाऊनसाठी जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील व्यावसायिकांनी पुढाकार घेतला आहे. व्यापारी, व्यावसायिक आजरा तालुक्यात उद्यापासून दहा दिवस लॉकडाऊन ठेवणार आहेत.

तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गामूळे व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. कडक लॉकडाऊन करणार असल्याबाबत प्रशासनाला निवेदनही दिले आहे. आजरा तालुक्यात आतापर्यंत 350 कोरोना रुग्ण तर 10 जणांचा कोरोनाबळी गेले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नवीन 300 आयसीयू आणि 400 ऑक्सिजन बेडचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, कोल्हापुरात आतापर्यंत एकूण 23 हजार 103 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकूण 699 जणांचा मृत्यू झालेला आहे. काल (30 ऑगस्ट) दिवसभरात एकूण 597 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 28 जणांचा मृत्यू झाला आहे. सांगलीत आतापर्यंत 11 हजार 203 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकूण 399 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात एकूण 19 जण कोरोना रुग्ण आढळले आहेत.

संबंधित बातम्या :

सांगलीतील स्मशानभूमीत कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत, भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले

Sangli Corona | सांगलीच्या माजी महापौरांचा कोरोनामुळे मृत्यू

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI