अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत आर्थिक मदत देऊ, दादा भुसे यांचे आश्वासन

शेतकऱ्यांना येत्या दिवाळीपर्यंत आर्थिक मदत मिळेल, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. (Agriculture Minister Dada Bhuse on Onion auction closed)

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत आर्थिक मदत देऊ, दादा भुसे यांचे आश्वासन

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी कांदा लिलाव व्यापाऱ्यांनी थांबवल्यामुळे चिंता व्यक्ती केली आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांसोबत याबाबत चर्चा झाली आहे. त्यांनी याबाबत अनेक मुद्दे मांडले आहेत. केंद्र सरकारने साठवणुकीची मर्यादा वाढवावी, अशी मागणी कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. तसेच राज्यात पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना येत्या दिवाळीपर्यंत आर्थिक मदत मिळेल, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. (Agriculture Minister Dada Bhuse on Onion auction closed)

“देशात 60 टक्के कांद्याचं उत्पादन हे महाराष्ट्रात होते. जवळपास देशात 80 टक्के कांद्याची निर्यात ही महाराष्ट्रातून होते. मात्र एक व्यापारी 25 टन कांदा ठेऊ शकतो असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यात विरोधाभास आहे. ग्राउंडवर जी परिस्थिती आहे त्यानुसार केंद्र सरकारने घ्यायला हवा. शेवटी नुकसान हे शेतकरी बांधवांच होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साठवणुकीची मर्यादा वाढवावी,” अशी विनंती दादा भुसेंनी केंद्राला केली आहे.

“त्याशिवाय हा सर्व विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानावर घालू,” असेही दादा भूसे म्हणाले. तसेच नाशिक जिल्ह्यातील व्यापारांसोबत झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी हे सर्व मुद्दे मांडले आहेत. ते सर्व मुद्देही मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे, असेही दादा भूसेंनी सांगितले.

“त्याशिवाय येत्या दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत दिली जाईल. गेल्या आठवडयात झालेल्या पावसाचे नुकसानाचे पंचनामे सुरू आहेत. याबाबत पुढच्या केबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल,” असेही दादा भूसेंनी सांगितले. (Agriculture Minister Dada Bhuse on Onion auction closed)

संबंधित बातम्या : 

सलग दुसऱ्या दिवशी बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद, शेतकरी चिंताक्रांत

उस्मानाबाद तालुक्यात फळबागांचे शून्य टक्के नुकसान, जिल्हा प्रशासनाचा अजब पंचनामा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI