सव्वाशे कोटी नागरिकांनी चीनची एकही वस्तू वापरु नये, चीन जागेवरच येईल : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चीनच्या मुद्द्यावर सडेतोड शब्दात आपली भूमिका व्यक्त केली (Ajit Pawar on India China tension and boycott).

सव्वाशे कोटी नागरिकांनी चीनची एकही वस्तू वापरु नये, चीन जागेवरच येईल : अजित पवार
Follow us
| Updated on: Jun 23, 2020 | 2:56 PM

मुंबई : भारत आणि चीनमधील तणावानंतर देशात महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं ज्याने चीनसोबतच्या आपल्या प्रकल्पांना स्थगिती दिली. यावर प्रश्न विचारला असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडेतोड शब्दात आपली भूमिका व्यक्त केली (Ajit Pawar on India China tension and boycott). जे राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेने बघते, त्यांच्या विरोधात कारवाई करायलाच हवी. नागरिकांनीही चिनी वस्तूंचा वापर करु नये, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “जे राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहते, आपल्याविरोधात कुरबुरी काढतं अशा राष्ट्रांच्या विरोधात कडक भूमिका घेतली पाहिजे. उलट आपल्या नागरिकांनी चीनमध्ये तयार झालेली एकही वस्तू वापरु नये. आपल्या देशातील सव्वाशे कोटी जनतेने जर असं केलं तर चीन जागेवरच येईल.”

“11 लाख शेतकरी पीक कर्जमाफीमध्ये बसत आहेत. मात्र, कोरोना संकटामुळे अडचणी आल्या आहेत. शेतकऱ्यांना 8 हजार कोटी रुपये वितरित करण्यासाठी बँकांना हमी दिली आहे. आपण टेस्टिंग वाढविल्या असल्याने रोज बाधित असणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतरांना देखील रेल्वे सुरु करा, अशी मागणी आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. ग्रामीण भागात कामे सुरु झाली आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी अजित पवार यांनी कोकणाच्या मदतकार्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “कोकणाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली असता दुर्गम भागातील वाड्या आणि काही ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या शिवाय अशा ठिकाणी मोफत रॉकेल देण्याबाबत निर्णय झाला आहे.”

अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याविषयी देखील स्पष्टपणे भूमिका मांडली. ते म्हणाले, “जोपर्यंत राज्य सरकारला खात्री होत नाही तोपर्यंत शाळा सुरु करुन राज्यातील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणार नाही.”

“रामदेवा बाबांच्या कोरोना औषधावर ज्याचा विश्वास त्यांनी ते घ्यावं”

अजित पवार यांनी रामदेव बाबा यांच्या कोरोनावरील आयुर्वेदिक औषधावरही मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “बाजारात अनेकजण कोरोनावर औषध आणण्याचा प्रयत्न करत आहेत. रामदेव बाबांनी कोरोनावर औषध आणलं आहे. ज्यांचा त्यांच्या औषधांवर विश्वास आहे त्यांनी ते घ्यावं.”

हेही वाचा :

नवी मुंबई महापालिका आयुक्तांची तडका फडकी बदली, अभिजित बांगर नवे आयुक्त

सोलापुरात कोरोना मृतांची संख्या 40 ने वाढून 217 वर, लपवाछपवी प्रकरणी रुग्णालयांना नोटीस

पतंजलीकडून कोरोनावरील Coronil औषध लाँच, 7 दिवसात रुग्ण बरा होण्याचा दावा

Corona Medicine : औरंगाबादच्या होलसेल मेडिकलमध्ये फेबीफ्लूचे औषध दाखल

Ajit Pawar on India China tension and boycott

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.