अकोल्यात कुख्यात आरोपीची दगडाने ठेचून हत्या, पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची शक्यता

मृतक मोनू काकडे याची अपराधीक पार्श्वभूमी असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अकोल्यात कुख्यात आरोपीची दगडाने ठेचून हत्या, पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची शक्यता

अकोला : शहरात कुख्यात आरोपीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे (Akola Notorious Accused Murdered). शहरातील न्यू तापडिया नगर येथे निर्माणाधीन पुलाजवळ ही घटना घडली. मृत आरोपीचं नाव मोनू काकड असं आहे. मोनू काकडवर अनेक गंभार गुन्हे दाखल आहेत (Akola Notorious Accused Murdered).

अकोला शहरातील सिव्हील लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या न्यू तापडिया नगर येथे निर्माणाधीन पुलाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी मोनू काकडवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मोनू काकडेचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मृतक मोनू काकडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून परस्पर वैमनस्यातून ही त्या झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम स्थानिक गुन्हे शाखेचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ सिव्हील लाईन्स पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांनी ताफ्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मृतकाच्या चेहऱ्यावर गंभीर घाव असून चेहरा दगडाने ठेचला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. ही हत्या का झाली असावी याचं कारण अद्यापही समोर येऊ शकलेलं नाही. सिव्हील लाईन्स पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Akola Notorious Accused Murdered

संबंधित बातम्या :

विक्रोळीत भांडणातून सुरक्षा रक्षकाला बांबूने जबर मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

जुलैमध्ये मैत्री, ऑगस्टमध्ये लव्ह मॅरेज, ऑक्टोबरमध्ये हत्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI