Laxmmi Bomb | ‘लक्ष्मी बॉम्ब’ पुन्हा वादात, चित्रपटाचे नाव बदलण्याच्या मागणीला जोर!

अक्षयसमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे नाव बदलावे अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

Laxmmi Bomb | ‘लक्ष्मी बॉम्ब’ पुन्हा वादात, चित्रपटाचे नाव बदलण्याच्या मागणीला जोर!
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 10:33 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Akshay Kumar Laxmmi Bomb) ट्रेलर प्रदर्शित झाल्या दिवसापासून वादात अडकला आहे. आता अक्षयसमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे नाव बदलावे अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. या नावामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे म्हणत, आता राष्ट्रीय हिंदू सेनेने या चित्रपटाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.(Akshay Kumar Laxmmi Bomb title controversy boycott demand by Hindu sena)

राष्ट्रीय हिंदू सेनेने केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून ‘लक्ष्मी बॉम्ब’ बंदी घालण्याची मागणी केली आहे. चित्रपटाचे नाव बदलले नाही, तर प्रदर्शनाच्या वेळी त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक चित्रपटगृहाबाहेर निषेधात्मक आंदोलन करतील, असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘हिंदू सेनेने प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहीत, ‘लक्ष्मी बॉम्ब’ बनवणाऱ्या निर्मात्यांविरूद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. कारण या चित्रपटाच्या नावातून देवी लक्ष्मी आणि हिंदूंचा अपमान केला आहे’, असे या ट्विटमध्ये लिहिले आहे.

‘हे’ आहे वादाचे नेमके कारण

एका विशिष्ठ समुदायाला भडकवण्यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे ठेवण्यात आल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. त्यांच्या मते, लक्ष्मी या नावासमोर बॉम्ब हा शब्द वापरणे अमान्य आहे. आपण ज्या लक्ष्मीची पूजा करतो, तिचा सन्मान करतो, तिच्या नावापुढे बॉम्ब असा शब्द लिहिणे अतिशय निंदनीय आहे. अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचे देखील हिंदू सेनेने म्हटले आहे. या चित्रपटात एक हिंदू मुलगी आणि मुस्लिम तरुणाची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. याच मुद्द्याला धरून, हिंदू सेनेने प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाचे नाव नाव बदलण्याची मागणी केली आहे. (Akshay Kumar Laxmmi Bomb title controversy boycott demand by Hindu sena)

हिंदू जनजागृती समितीकडूनही बंदीची मागणी

चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ हेतूपूर्वक ठेवले गेले आहे. त्यामुळे आमचा पहिला आक्षेप या चित्रपटाच्या नावाला असून यातून कोट्यवधी हिंदूंचे दैवत असलेल्या श्रीलक्ष्मीदेवीची विटंबना केली आहे. एकीकडे हिंदु देवतेचा अपमान करणारे ‘लक्ष्मी फटाके’ बंद करण्यासाठी आम्ही गेली अनेक वर्षे प्रबोधन करत असतांना, या चित्रपटाच्या नावामुळे त्यांना पुन्हा प्रोत्साहनच मिळणार असल्याचे सांगत, या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी  हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात आली होती.

या चित्रपटात नायकाचे नाव ‘आसिफ’, तर नायिकेचे नाव ‘प्रिया यादव’ ठेवल्याचे दिसत आहे, अर्थात त्यातून मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांचे संबंध दाखवून हेतूतः ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहनच दिले आहे, असा आरोपही हिंदु जनजागृती समितीने केला आहे.

एकीकडे ‘मोहम्मद : दी मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटामुळे मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतात, म्हणून त्यावर स्वतः दखल घेऊन लगेच बंदीची शिफारस महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्याच धर्तीवर हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावरही सरकारने बंदीची शिफारस करावी, अशी मागणीही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

(Akshay Kumar Laxmmi Bomb title controversy boycott demand by Hindu sena)

संबंधित बातम्या :

अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा धुमाकूळ, 24 तासात 7 कोटी व्ह्यूज

Laxmmi Bomb Trailer | ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा जोरदार धमाका, अक्षय कुमारचा नवा ‘क्वीन’ अंदाज!

श्रीलक्ष्मीचा अपमान, ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन… ‘लक्ष्मी बॉम्ब’वर बंदी घाला; हिंदु जनजागृती समितीची मागणी

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.