‘ये है हिंदुस्थान के मुसलमान’, जबरदस्त डायलॉग, ‘सूर्यवंशी’चा रोमांचक ट्रेलर

'ये है हिंदुस्थान के मुसलमान', जबरदस्त डायलॉग, 'सूर्यवंशी'चा रोमांचक ट्रेलर

मुंबई : टाळ्या आणि शिट्या मिळवणारे जबरदस्त डायलॉग, एकापेक्षा एक अॅक्शन सिक्वेन्स, ‘एक से भले तीन’ म्हणावं असे अक्षयकुमारच्या जोडीला आलेले ‘सिम्बा’ रणवीर सिंह आणि ‘सिंघम’ अजय देवगन. रोहित शेट्टी दिग्दर्शित अक्षयकुमार आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक्ड ट्रेलर लाँच झाला आहे. (Akshay Kumar Sooryavanshi Official Trailer)

मंगळवारी संध्याकाळी 24 मार्चच्या मुहूर्तावर ‘सूर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बुधवारी म्हणजेच 25 मार्चला गुढीपाडव्याची सुट्टी आहे. मराठी नूतन वर्षाच्या आदल्या दिवशी सिनेमा रिलीज करुन प्रेक्षकांसाठी ‘लाँग वीकेंड’ तयार करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी ‘नाईट लाईफ’ योजनेचा ‘पहिला लाभार्थी’ ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट ठरणार आहे. मुंबईतील थिएटर येत्या 24 मार्चपासून 24 तास सुरु राहणार आहेत. त्यामुळे मुंबईकर प्रेक्षक दिवसाच्या कुठल्याही प्रहरी सूर्यवंशी चित्रपटाचा खेळ पाहू शकणार आहेत.

‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमार एटीएस प्रमुखाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी शुक्रवार 27 मार्चला सिनेमा रिलीज करण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. परंतु ठाकरे सरकारच्या नव्या योजनेनंतर ही तारीख बदलण्यात आली.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाचं चांगल्याप्रकारे मार्केटिंग करण्यात येत आहे. ‘सूर्यवंशी’च्या टीझरनंतर ट्रेलरमध्येही अजय देवगण आणि रणवीर सिंह या दोघांचं दर्शन घडतं. रोहित शेट्टीने इन्स्टाग्राम, तर अक्षयकुमारने ट्विटरवरुन हा ट्रेलर शेअर केला आहे.

रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ सिनेमाचा सिक्वेल असलेल्या ‘सिम्बा’ चित्रपटात अक्षयने ‘सूर्यवंशी’ चित्रपटाची घोषणा केली होती. रणवीर सिंहच्या ब्लॉकबस्टर ‘सिम्बा’ने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले होते. (Akshay Kumar Sooryavanshi Official Trailer)

 


Published On - 12:49 pm, Mon, 2 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI