अमेठीत तयार होणारी सर्वात घातक AK-203 रायफल कशी असेल?

लखनऊ:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील अमेठी इथं भारत-रशियाच्या शस्त्रास्त्र कारखान्याचं उद्घाटन करण्यात आलं. या फॅक्टरीत अत्याधुनिक AK-203 या रायफलची निर्मिती केली जाणार आहे. भारत आणि रशियाची कंपनी एकत्रित मिळून या रायफलची निर्मिती करणार आहे. या फॅक्टरीतून भारतासाठी तब्बल 7.50 लाख रायफल्स तयार केल्या जाणार आहेत. जगातली सर्वात आधुनिक अशी ही AK 203 […]

अमेठीत तयार होणारी सर्वात घातक AK-203 रायफल कशी असेल?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:21 PM

लखनऊ:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील अमेठी इथं भारत-रशियाच्या शस्त्रास्त्र कारखान्याचं उद्घाटन करण्यात आलं. या फॅक्टरीत अत्याधुनिक AK-203 या रायफलची निर्मिती केली जाणार आहे. भारत आणि रशियाची कंपनी एकत्रित मिळून या रायफलची निर्मिती करणार आहे. या फॅक्टरीतून भारतासाठी तब्बल 7.50 लाख रायफल्स तयार केल्या जाणार आहेत. जगातली सर्वात आधुनिक अशी ही AK 203 रायफल आहे. त्यामुळे आता लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे.

AK सीरिजचं अपडेट व्हर्जन

AK-203 ही एके सीरिजची सर्वात अत्याधुनिक अपडेट रायफल आहे. याआधीचं AK-47 हे सर्वात जबरदस्त मॉडेल म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर AK- 74, AK- 56, AK- 100 आणि AK- 200 या रायफल्स आल्या होत्या. आता त्याच्या पुढचं व्हर्जन AK-203 भारताच्या ताफ्यात दाखल होणार आहे. AK-203 रायफलमध्ये ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक दोन्ही प्रकार उपलब्ध असतील.  महत्त्वाचं म्हणजे हायटेक असलेल्या AK-203 रायफलमधून एका मिनिटात 600 गोळ्या झाडल्या जाऊ शकतात. 400 मीटर अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता या अत्याधुनिक रायफलमध्ये आहे.

सर्व दलांना नव्या बंदुका

सीमारेषेवर सातत्याने पाकिस्तानकडून गोळीबार सुरु असतो. शिवाय दहशतवाद्यांकडूनही सतत हल्ले होत असतात. त्यामुळे भारताच्या संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्यांना अद्याधुनिक शस्त्र देण्याचा निर्णय घेतला. AK-203 या रायफल्स आधी तीनही दलांच्या जवानांना देण्यात येतील. त्यानंतर अर्धसैनिक दल आणि राज्यांच्या पोलिसांनाही या रायफल्स पुरवल्या जातील.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.