AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंचन घोटाळ्यात राज्य सरकारचा अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न?

राज्य सरकारने नागपूर विभागातील सिंचन घोटाळा प्रकरणात (Irrigation Scam) न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. मात्र, या प्रतिज्ञापत्रात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं कुठंही नाव नाही.

सिंचन घोटाळ्यात राज्य सरकारचा अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न?
| Updated on: Sep 17, 2019 | 11:46 AM
Share

नागपूर: राज्य सरकारने नागपूर विभागातील सिंचन घोटाळा प्रकरणात (Irrigation Scam) न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. मात्र, या प्रतिज्ञापत्रात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं कुठंही नाव नाही. काही दिवसांपूर्वीच सरकारनं अजित पवार सिंचन घोटाळ्यास जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, सोमवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांचं नाव नसल्यानं सरकार अजित पवारांना वाजवण्याचा प्रयत्न करत आहे का? असाही सवाल उपस्थित होत आहे. याचिकाकर्ते आणि जनमंच संस्थेचे (Janmanch Organization) तत्कालीन अध्यक्ष शरद पाटील (Sharad Patil) यांनी देखील अजित पवारांचं नाव नसल्यानं नाराजी व्यक्त केली. तसेच राज्य सरकार केवळ राजकारणासाठी सिंचन घोटाळ्याचा वापर करत असल्याचा आरोप केला.

नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यात गोसेखुर्द प्रकल्पातील तब्बल 155 टेंडरची चौकशी सुरू आहे. या घोटाळ्यात 20 एफआयआर दाखल झाले असून 5 प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा या घोटाळ्याशी काही संबंध आहे की नाही, याबाबतही सरकारनं काहीही उत्तर दिलं नाही. राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने माजी उपमुख्यंत्री अजित पवार सिंचन घोटाळ्यास जबाबदार असल्याचं न्यायालयात सांगितलं होतं. मात्र, नुकत्याच सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांबाबत सरकारने काहीही उत्तर दिलेलं नाही. अजित पवार जलसंसाधन मंत्री असताना, विदर्भातील काही सिंचन प्रकल्पात अनियमितता आढळून आली होती. याला सरकारने अजित पवार जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जनमंच सामाजिक संस्थेनं विदर्भातील सिंचन घोटाळ्यांबाबत जनहित याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने चौकशीही सुरू आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.