अंबरनाथमध्ये भररस्त्यात मनसे शहर उपाध्यक्षावर टोळक्याचा हल्ला; धारदार शस्त्रांनी वार, उपचारादरम्यान मृत्यू

हल्लेखोरांनी राकेश पाटील यांना खाली पाडत त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी वार केले. | Attack on MNS leader

अंबरनाथमध्ये भररस्त्यात मनसे शहर उपाध्यक्षावर टोळक्याचा हल्ला; धारदार शस्त्रांनी वार, उपचारादरम्यान मृत्यू
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 10:53 PM

अंबरनाथ: अंबरनाथ शहरात बुधवारी मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील (MNS Rakesh Patil) यांची भररस्त्यात धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे अंबरनाथमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रिलायन्स रेसिडेन्सी परिसरात हा प्रकार घडला. संध्याकाळी साधारण साडेसहा ते सातच्या सुमारास राकेश पाटील येथील आर मार्टजवळ उभे होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी राकेश पाटील यांच्यावर हल्ला केला. (Attack on MNS ledar in Ambernath)

हल्लेखोरांनी राकेश पाटील यांना खाली पाडत त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी वार केले. यामध्ये पोटात आणि मानेवर वर्मी घाव बसल्याने राकेश गंभीर जखमी झाले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने आधी उल्हासनगरच्या एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. याठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोर्टिस हॉस्पिटलबाहेर धाव घेतली. तर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू करत आरोपींचा शोध सुरू केला. राकेश पाटील यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी दोन गाड्यांमधून पळून गेले. त्यापैकी एक गाडी अंबरनाथमार्गे मुरबाडच्या दिशेने गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली.

यानंतर मुरबाड पोलिसांनी रायता परिसरात नाकाबंदी केली आणि काही वेळातच आरोपी पळून जात असलेली गाडी पोलिसांनी पकडली. या गाडीतून चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली गाडी अंबरनाथमधील एका गावगुंडाच्या नावावर असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. हा गुंड अंबरनाथ शहरातील एका नामांकित बिल्डरसाठी काम करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

इतर बातम्या:

शिवसेना माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची हत्या; 24 तासात दोन हत्येच्या घटनांनी लोणावळा हादरलं

भर दिवसा सेवानिवृत्त शिक्षकाची हत्या, गुन्हा करून आरोपी स्वत: पोलीस स्टशनमध्ये हजर

क्षुल्लक कारणावरुन सासूची गळा आवळून हत्या, गोंदियातील धक्कादायक घटना

(Attack on MNS ledar in Ambernath)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.