जनतेनं एनडीएला दिलेलं समर्थन अद्भुत, देशाची दिशाभूल करणाऱ्यांना धडा मिळाला : अमित शाह

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली (Amit Shah on Bihar Assembly Election Result 2020).

जनतेनं एनडीएला दिलेलं समर्थन अद्भुत, देशाची दिशाभूल करणाऱ्यांना धडा मिळाला : अमित शाह
Kolkata: Union Home Minister Amit Shah addresses a press meet, in Kolkata, Friday, Nov. 6, 2020. (PTI Photo/Ashok Bhaumik)(PTI06-11-2020_000224B)
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 1:10 AM

नवी दिल्ली : “जनतेने नरेंद्र मोदी आणि एनडीएला दिलेलं समर्थन अद्भूत आहे. या निकालामुळे मोदी सरकारच्या कोरोनाविरुद्धच्या यशस्वी लढाईत गरीब, मजूर, शेतकरी आणि युवकांचा विश्वास दिसून आलाच, त्याचबरोबर देशाची दिशाभूल करणाऱ्यांनाही धडा मिळाला”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटवर दिली आहे (Amit Shah on Bihar Assembly Election Result 2020).

“बिहारच्या प्रत्येक वर्गाने जातीवाद करणाऱ्यांना नाकारुन एनडीएचा विकासाचा झेंडा फडकवला. ही प्रत्येक बिहारी नागरिकाच्या आशा आणि आकांक्षीची जीत आहे. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या डबल इंजन विकासची जीत आहे. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन”, असं अमित शाह म्हणाले (Amit Shah on Bihar Assembly Election Result 2020).

“बिहारमध्ये विकास, प्रगती आणि सुशासनाची पुन्हा निवड केल्याबद्दल मी बिहारच्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो. विशेषत: युवा पिढी आणि महिलांनी बिहारच्या सुरक्षा आणि उज्ज्वल भविष्याची निवड करुन एनडीएचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन केलं”, असंदेखील अमित शाह म्हणाले.

बिहारच्या जनतेचं पंतप्रधान मोदींकडून आभार

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी देखील ट्विटरवर जनतेचे आभार मानले आहेत. “बिहारच्या युवा पिढीने सिद्ध केलंय की, नवं दशक हे बिहारचं असेल. बिहारच्या युवकांनी एनडीएच्या संकल्पावर विश्वास ठेवला आहे. या युवा ऊर्जामुळे एनडीएला आणखी परिश्रम करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आहे”, असं मोदी म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या : Bihar Election Result : बिहारमध्ये एमआयएम किंगमेकर ठरणार? 4 जागांवर विजय, तर एका ठिकाणी आघाडीवर

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.