मेळघाटात महिलेवर सामूहिक बलात्कार, तात्काळ कारवाई करा, भाजपचा तीव्र आंदोलनाचा इशारा

धारणी तालुक्यातील टेंबली येथे एका महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.

मेळघाटात महिलेवर सामूहिक बलात्कार, तात्काळ कारवाई करा, भाजपचा तीव्र आंदोलनाचा इशारा
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 11:10 PM

अमरावती : धारणी तालुक्यातील टेंबली येथे एका महिलेवर दोन नराधमांनी (Melghat Gang Rape Case) सामूहिक बलात्कार केला. मात्र, राजकीय दबावापोटी पोलिसांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपाच्या अमरावती जिल्हाध्यक्ष निवेदिता दीघडे आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला. त्यांनी आज धारणी पोलीस ठाण्यावर धडक दिली (Melghat Gang Rape Case).

नेमकं काय घडलं?

बसची वाट पाहत असलेल्या महिलेला दोन युवकांनी थोड्याच अंतरावर बस उभी असल्याचे सांगून तिला मोटारसायकल वर बसवले. त्यांनी महिलेला धारणीहून टेंबली जवळच्या एका शेताजवळ नेलं. तिथे त्यांनी या महिलेला मारहाण सुरु केली. या दोघांनी बळजबरीने तिच्या तोंडात दारु ओतली. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हाती लागले. मात्र, सताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी देखील हे प्रकरण गुंढाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निवेदिता चौधरी दीघडे आणि शिवराय कुळकर्णी यांनी केला. आज त्यांच्या नेतृत्वात मेळघाटातील भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी धारणी पोलीस ठाण्यावर धडकले.

सामूहिक बलात्कार असताना 376-2 ऐवजी केवळ 376 कलम लावण्यात आले होते. पीडित महिला दलित असूनही अॅट्रोसिटी अॅक्ट लावण्यात आलेला नव्हता. आज भाजपने या प्रकरणी तात्काळ पावले उचलण्याचा अल्टीमेटम पोलिसांना दिला. दोन दिवसात पिडितेला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भाजपने दिला. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या जिल्ह्यात महिला सुरक्षित नसल्याबद्दल भाजपाने राज्य सरकारचा निषेध केला.

Melghat Gang Rape Case

संबंधित बातम्या :

अनैतिक संबंधातून तिघी मायलेकींची हत्या, बुलडाणा हादरलं!

संगमनेरमध्ये भावाकडून अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार, मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.