गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत मोबाईल वाटप

इयत्ता 6 वी ते 11 वीपर्यंतच्या 10 गरजू आणि होतकरु विद्यार्थ्यांना आनलाईन शैक्षणिक सुविधेसाठी स्मार्ट फोन मोबाईल वितरीत करण्यात आले.

गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत मोबाईल वाटप

अमरावती : शाळा आणि विद्यार्थी यांचं नातं अतूट असतं. विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीत (Amravati Mobile Donate) शाळेचे महत्वपूर्ण योगदान असते. त्यामुळे शाळेला विद्यार्थ्यांचे ही काही देणे लागते, या भावनेतून अमरावतीच्या जवाहर नवोदय विद्यालयमधील माजी विद्यार्थी संघटना नेहमीच विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत असते (Amravati Mobile Donate).

शाळा आणि विद्यार्थी यामधील ऋणानुबंध जोपासत आज अमरावतीच्या जवाहर नवोदय विद्यालयामधील माजी विद्यार्थी संघटना आणि उज्वल सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जवाहर नवोदय विद्यालय नवसारी, अमरावती येथील इयत्ता 6 वी ते 11 वीपर्यंतच्या 10 गरजू आणि होतकरु विद्यार्थ्यांना आनलाईन शैक्षणिक सुविधेसाठी स्मार्ट फोन मोबाईल वितरीत करण्यात आले.

या उपक्रमाच्या सफल आयोजनासाठी जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. शीतल उमरे नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील नामवंत डॉक्टर आणि समाजसेवक आशिष पाटील यांच्या प्रयत्नाने हा उपक्रम राबविण्यात आला. तर, माजी विद्यार्थ्यांनी काही जुन्या आठवणींना सुद्धा उजाळा देऊन जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षक वृंदाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

Amravati Mobile Donate

संबंधित बातम्या :

आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशात 5 टक्के आरक्षण, उदय सामंत यांची घोषणा

जेसीबीतून गुलालाची वर्षपूर्ती, पिण्याचे पाणी ते डिजीटल शिक्षण, रोहित पवारांकडून रिपोर्ट कार्ड सादर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI