जेसीबीतून गुलालाची वर्षपूर्ती, पिण्याचे पाणी ते डिजीटल शिक्षण, रोहित पवारांकडून रिपोर्ट कार्ड सादर

कर्जत जामखेडच्या मातीत विकासाचं पिक काढण्याचा माझा प्रयत्न सुरु असल्याचं सांगत आमदार रोहित पवार यांनी एका वर्षात केलेल्या कामाचं रिपोर्टकार्ड कर्जत जामखेडकरांसमोर ठेवलं आहे.

जेसीबीतून गुलालाची वर्षपूर्ती, पिण्याचे पाणी ते डिजीटल शिक्षण, रोहित पवारांकडून रिपोर्ट कार्ड सादर
Follow us
| Updated on: Oct 24, 2020 | 4:15 PM

मुंबई : कर्जत जामखेडच्या मातीत विकासाचं पिक काढण्याचा माझा प्रयत्न सुरु असल्याचं सांगत आमदार रोहित पवार यांनी एका वर्षात केलेल्या कामाचं रिपोर्टकार्ड कर्जत जामखेडकरांसमोर ठेवलं आहे. “कर्जत-जामखेडवासियांनी प्रचंड विश्वासाने माझ्या अंगावर विजयाचा गुलाल टाकला, या घटनेला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय. तसं पाहिलं तर आमदार म्हणून काम करताना एक वर्षाचा कालावधी हा खूप छोटा असतो, पण तरीही गेल्या वर्षभरात माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी काय केलं याची गोळाबेरीज इथल्या जनतेसमोर मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो”, असं ते म्हणाले. (Rohit pawar present report Card Of 1 Year Work In Front Of karjat jamkhed People)

“निवडणुकीपूर्वीपासूनच मतदारसंघात संपर्क असल्याने इथल्या कामाचा बऱ्यापैकी आवाका लक्षात आला होता. रस्ते, पाणी, वीज हे मूलभूत प्रश्न तर आ वासून होतेच पण सरकारी योजनाही लोकांपर्यंत पोचत नव्हत्या. त्यामुळं प्रत्येक विषयाचा बारकाईने अभ्यास करुन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केला. रस्ते, पाणीपुरवठा, वीज याचे अनेक प्रस्ताव मंजूर करुन आणले. ही कामे लवकरच सुरु होतील. निवडणुकीपूर्वीपासूनच पाण्याचे टँकर सुरू होतेच, शिवाय गरज असेल तिथं नंतरही टँकर सुरु ठेवले. सीएसआर, ‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन’ यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन अनेक कामं हाती घेतली. त्यामध्ये वर्षानुवर्षे गाळाने भरलेल्या आणि झाडा-झुडपांनी वेढलेल्या विंचरणा व लेंडी नदीचा गाळ काढून नदीचं सुशोभीकरण करण्याचं काम हाती घेतलं” असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.

“अनेक वाड्यावस्त्यांवर किंवा गावांमध्ये तातडीची गरज असलेल्या ठिकाणी रस्त्याची सोय व्हावी म्हणून मुरूम टाकून रस्ते तयार केले. चाऱ्यांमधून कधी पाणी येतच नव्हतं, त्यामुळं चाऱ्या फक्त नावालाच होत्या. अशा कित्येक किलोमीटर चाऱ्यांची दुरुस्ती केली, त्यांना गेट बसवले. कुकडी व सीना चाऱ्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचं शेतकरी आणि अधिकाऱ्यांना एकत्रित घेऊन पहिल्यांदा नियोजन केल्याने गेल्या वीस वर्षांत अनेक ठिकाणी या चाऱ्यांतून पहिल्यांदा पाणी आल्याचं शेतकऱ्यांनी पाहिलं. वर्षानुवर्षे अडकलेला कुकडी प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मोबदला मिळवून देण्यास सुरुवात” झाल्याचं देखील रोहित यांनी सांगितलं.

“आतापर्यंत 28 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून उर्वरित प्रस्तावही लवकर मंजूर होतील आणि यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. 2018 तील खरीप हंगामातील अडकलेली विम्याची 90 कोटी रक्कम मतदारसंघात आणि जिल्ह्यात 140 कोटी पेक्षा अधिक रक्कम तसंच कांदा चाळीसाठीचं रखडलेलं अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न केले आणि आज मतदारसंघातील 60 हजार पेक्षा अधिक तर नगर जिल्ह्यातील दीड लाखापेक्षाही अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा” झाल्याचं रोहित म्हणाले.

“तूर, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, कांदा आदी पिकांची हमी भावाने खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू केली, यामुळं शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टळली. बाबांच्या (राजेंद्र दादा पवार) माध्यमातून दोन्ही तालुक्यात पीक नियोजन करुन कमी कालावधीत अधिकाधिक उत्पादन घेऊन शेतकऱ्यांना अधिकचे चार पैसे कसे मिळतील”, याचाही प्रयत्न सुरु असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.

आरोग्य व्यवस्था- कोरोनाच्या सुरवातीच्या चार महिन्यांच्या काळात कर्जत-जामखेडमधील शासकीय रुग्णालयांना औषधं, वैद्यकीय उपकरणं, PPE किट, मास्क यासारखी प्रतिबंधात्मक साधणं आणि आवश्यक त्या सुविधा पुरवल्या. कोरोनाच्या पेशंटची संख्या वाढू लागल्यानंतर या सुविधांचा मोठा फायदा झाला. सुरवातीला दोन्ही तालुक्यात मध्यवर्ती क्वारंटाइन सेंटर सुरू केले. तिथं आंघोळीसाठी गरम पाण्यापासून तर चांगल्या दर्जाच्या जेवणाची सोय केली. डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी, आरोग्य सेवक, पोलीस, आशाताई, अंगणवाडी सेविका, पत्रकार, मेडिकल स्टोअर्स चालक या कोरोना योध्यांना मास्क, सॅनिटायझरचं वाटप केलं.

कंटेन्मेंट झोनमध्ये असलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अगदी कांद्या-बटाट्यापासून तर धान्य व डाळी, साखर आदी किराणा मालापर्यंतच्या सर्व साहित्याचा पुरवठा केला. सॅनिटायझरची गरज लाखात घेऊन राज्यभरातील पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, तीर्थक्षेत्र आणि शासकीय कार्यालयांमध्ये सुमारे ६० हजार लिटर सॅनिटायझरचा मोफत पुरवठा केला.

महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून हजारो लोकांना विविध दाखल्यांचं वाटप केलं. वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यात रोजगार मेळावे घेतले. या मेळाव्याच्या माध्यमातून पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरातील अनेक कंपन्यांमध्ये माझ्या मतदारसंघातील काही युवांना काम मिळालं, याचं मनापासून समाधान आहे.

डिजीटल शिक्षण- शिक्षणाचं महत्त्व आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यादृष्टीने सर्वसामान्यांची मुलं ज्या जिल्हा परिषदेच्या आणि सरकारी शाळांमध्ये शिकतात त्यांनाही शहरातील खासगी शाळांप्रमाणे उत्तम शिक्षण मिळावं, याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी या शाळांना डिजिटल पॅनेल दिले. ऑनलाइन शिक्षणासाठी अ‌ॅप विकसित करुन मुलांना घरबसल्या ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली. गावोगावच्या युवा मित्रांच्या सहकार्याने लॉकडाऊनच्या काळात ‘माझं गाव माझी शाळा’ हा राज्यात पहिलाच अभिनव उपक्रम सुरू केल्याने लॉक डाऊनमध्येही जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांचं शिक्षण थांबलं नाही. विशेष म्हणजे या उपक्रमाचं राज्यात कौतुक झालं, ही माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे.

महिला बालविकास

महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यात महिला समुपदेशन केंद्र सुरू करुन महिला भगिनींना न्याय देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुलींच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘स्वस्थ कन्या उज्ज्वल भविष्य’ हा उपक्रम निरंतर सुरूय आणि त्यासाठी माझ्या मातोश्री सुनंदाताई पवार या प्रचंड मेहनत घेत आहेत, हे आपण पाहतंच आहात.

कर्जत जामखेड पर्यटन विकास आराखडा कर्जत-जामखेडचा पर्यटन विकास आराखडा तयार केला असून तो मंजुरीसाठी राज्य सरकारकडं सादर केलाय. कर्जतजवळ जैव विविधता उद्यान प्रस्तावित असून त्याचंही काम लवकरच सुरू होईल.

कर्जत जामखेडकरांचं MIDC चं लवकरच साकार करणार

कर्जत-जामखेडकरांचं MIDC चं स्वप्न गेल्या अनेक वर्षांपासून अधुरं आहे. ते साकार करण्याची संधी मला मिळतेय, हे मी माझं भाग्य समजतो. या विषयावर आजवर फक्त राजकारण झालं पण निवडून आल्यानंतर मी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळं MIDC ला राज्य सरकारने मान्यता दिली. सर्वेक्षणाचं कामही सुरू असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरवात होईल आणि ही MIDC कर्जत-जामखेड तालुक्याच्या विकासाचं इंजिन असेल. यामुळं इथली बाजारपेठ भरभराटीस येईलच शिवाय इथल्या युवांना रोजगारासाठी अन्य शहरात जाण्याची वेळ येणार नाही, असा माझा प्रयत्न आहे. आधीच्या सरकारच्या काळात मतदारसंघातील हक्काचं SRP ट्रेनिंग सेंटर सहजपणे सोडून दिलं होतं, ते पुन्हा मतदारसंघात आणलं.

रस्त्याची कामे प्रगतीपथावर, वीजेचा प्रस्ताव सादर

सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे श्रीगोंदा-जामखेड आणि नगर सोलापूर या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या मंजुरीचं काम अंतिम टप्प्यात आहे. खर्ड्यापर्यंत असलेल्या पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग कुर्डुवाडीपर्यंत नेण्यासाठी केंद्र सरकारकडं पाठपुरावा सुरुय. करमाळा-नान्नज-जामखेड हा रस्ता बीड जिल्ह्यातील पाटोदा पर्यंत जोडण्यासाठी पाठपुरावा सुरुय. कर्जत नगर पंचायत व जामखेड नगर परिषद यांना विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. न्यायालयासाठी भरीव निधी मंजूर करुन आणला.

वीज प्रश्नाचा प्रस्ताव शासनाकडे सादर

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करता यावा यासाठी कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यात सोलर प्रकल्प मंजुरीसाठी शासनाकडं सादर केलाय. लवकरच त्यालाही मंजुरी मिळेल.

पोलीस ठाण्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न

“पोलीस निरीक्षक दर्जाचे दोन अधिकारी मतदारसंघात आहेत, पण सुरक्षिततेची गरज लक्षात घेऊन पोलीस ठाण्यांची संख्याही वाढवतोय”.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी

“जामखेडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी उजनी धरणातून आणण्यात येणाऱ्या पाणी योजनेच्या मंजुरीचा फक्त कागद एखाद्या सभेत न फडकवता खऱ्या अर्थाने 109 कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनेला प्रशासकीय मंजुरी आणली. पिण्याच्या पाण्याचं हे पुण्याचं काम करण्याची संधी मला मिळतेय, हे माझं भाग्यच आहे.”

मराठा-धनगर आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा

“मराठा आणि धनगर आरक्षणासाठी राज्यात शांततापूर्वक आंदोलन करण्यात आले होते. पण या आंदोलकांवर राजकीय हेतूने मागील सरकारने गुन्हे दाखल केले. ते मागे घेण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळं 291 गुन्हे मागे घेण्यास शासनाने मान्यता दिलीय. उर्वरित गुन्ह्यांबाबतही लवकरच निर्णय होईल शिवाय धनगर समाज बांधवांवरील गुन्हेही मागे घेण्याचा शासनस्तरावर विचार सुरू असून संबंधित गुन्ह्यांची माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळं हे गुन्हेही लवकरात लवकर मागे घेण्यात येतील.”

“कर्जत जामखेडकरांसाठी मोठं क्रीडासंकुल तसंच तसंच दळवळणासाठी महत्त्वाचं असलेला बस डेपो लवकरच उभा राहील, असं आश्वासन त्यांनी दिलंय. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगाव इथं सुरू होण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करून आणली. ग्रामविकास विभागाच्या पंचवीस-पंधरा या लेखाशिर्षाअंतर्गत ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधांसाठीही कोट्यवधी रुपयांचा भरीव निधी मंजूर करून आणला. तुकाई उपसा सिंचन योजनेची व्याप्ती वाढवण्याचाही प्रयत्न सुरू असून बाबतचा प्रस्तावही अंतिम स्तरावर असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं.

यापलिकडे जाऊन सांगायचं झालं तर ही कामं केवळ ढोबळ स्वरुपात मांडलीय. अनेक कामांचा समावेश यात केलेलाही नाही. या सर्व कामांची तपशीलवार माहिती माझ्या कर्जत आणि जामखेड येथील कार्यालयातही उपलब्ध असल्याचं रोहित यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे मी एकटा हे सर्व करु शकत नाही. त्यासाठी ‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन’, बारामती ऍग्रो लिमीटेड, कृषी विज्ञान केंद्र बारामती, या संस्थांसोबतच इतरही अनेक संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी, महिला भगिनी, युवा या सर्वांचंच मोलाचं सहकार्य मिळतंय, हे मी नम्रपणे मान्य करत रोहित पवार यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

थोडक्यात काय तर कर्जत-जामखेडच्या विकासाची पेरणी केली असून प्रयत्नांची मेहनत आणि सर्वसामान्य जनतेच्या साथीचं खत घालून कर्जत-जामखेडच्या मातीत विकासाचं पीक काढण्याचा माझा प्रयत्न आहे. हे पीक लवकरच बहरात येईल, असा विश्वास आहे. वर्षभरातील कामांचा हा लेखा जोखा मांडत असताना विरोधकांनीही केवळ विरोधासाठी विरोध न करता कर्जत-जामखेडच्या विकासासाठी सहकार्य करावं, असं माझं आवाहन आहे. कारण इथं कुण्या ‘एका व्यक्तीचा’ विकास करण्याचं काम सुरू नाही तर संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्याचं काम सुरु आहे, असं शेवटी रोहित पवार म्हणाले. (Rohit pawar present report Card Of 1 Year Work In Front Of karjat jamkhed People)

संबंधित बातम्या

‘रोहित पवारांनी कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बियाणं विकून समाजकारण नाही धंदा केला’

ओहोटी संपली आता भरती येणार, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर रोहित पवारांचे सूचक ट्विट

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.