ओहोटी संपली आता भरती येणार, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर रोहित पवारांचे सूचक ट्विट

रोहित पवार यांच्या या वक्तव्याचा नक्की काय अर्थ लावायचा, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. | Eknath Khadse

ओहोटी संपली आता भरती येणार, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर रोहित पवारांचे सूचक ट्विट

मुंबई: भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. एकीकडे भाजपचे नेते सावधपणे प्रतिक्रिया देत असताना महाविकासआघाडीतील सर्व नेत्यांनी एकनाथ खडसेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या सगळ्यात शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. रोहित पवार यांनी एकनाथ खडसे यांना वेलकम म्हणत राष्ट्रवादीत त्यांचे स्वागत केलेय. तर दुसरीकडे रोहित पवार यांनी वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी संपली असे म्हणणाऱ्या विरोधकांना टोलाही लगावला. (Rohit Pawar reaction on Eknath Khadse joining NCP)


राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली’, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते, असे रोहित पवार यांनी म्हटले. आता रोहित पवार यांच्या या वक्तव्याचा नक्की काय अर्थ लावायचा, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकनाथ खडसे यांच्यानंतर भाजपमधील नाराज नेतेही राष्ट्रवादीत येणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्यासोबत पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे हे नेतेही देवेंद्र फडणवीसांवर नाराज होते. त्यामुळे खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपमधील फडणवीसविरोधी गट बंड करणार का, हे पाहावे लागेल.

एकनाथ खडसेंच्या घरी कार्यकर्त्यांची रेलचेल, राजकीय भूकंप करण्यासाठी फौज सज्ज
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांच्या बंगल्यावर समर्थक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रेलचेल सुरु झाली आहे. अनेक कार्यकर्त्यांमध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची उत्सुकता असून राजकीय भूकंप करण्यासाठी फौज सज्ज झाल्याचं ही पाहायला मिळत आहे. “नाथाभाऊ जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल,” अशी भावना एकनाथ खडसेंचे कार्यकर्ते व्यक्त करत आहे.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस ते शिवसेना, NCP; एकनाथ खडसेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

खडसेंच्या राजीनाम्याच्या तारखेचा असाही योगायोग; वर्षभरापूर्वी 21 ऑक्टोबरला काय घडले?

फडणवीसांचं राजकारण इतकं खुनशी असेल वाटलं नव्हतं, खडसेंच्या राजीनाम्यानंतर ‘राष्ट्रवादीची तोफ’ धडाडली

EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!

(Rohit Pawar reaction on Eknath Khadse joining NCP)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *