AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खडसेंच्या राजीनाम्याच्या तारखेचा असाही योगायोग; वर्षभरापूर्वी 21 ऑक्टोबरला काय घडले?

भाजपच्या 'महाभरती'मुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था बुडत्या जहाजाप्रमाणे भासत होती. | Eknath Khadse

खडसेंच्या राजीनाम्याच्या तारखेचा असाही योगायोग; वर्षभरापूर्वी 21 ऑक्टोबरला काय घडले?
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 21, 2020 | 1:20 PM
Share

मुंबई: भाजपमध्ये बऱ्याच काळापासून नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. ते शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी बुधवारी पक्षाकडे आपला राजीनामा पाठवला. यानंतर राजकीय वर्तुळात एकनाथ खडसे यांनी राजीनामा देण्यासाठी 21 ऑक्टोबरचा मुहूर्त जाणीवपूर्वक निवडला का, याची चर्चा रंगली आहे.

कारण, वर्षभरापूर्वी याच तारखेला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले होते. त्यावेळी भाजपच्या ‘महाभरती’मुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था बुडत्या जहाजाप्रमाणे भासत होती. शरद पवार यांच्या जवळच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात औषधालाच शिल्लक राहील, असे भाजपच्या नेत्यांकडून हिणवले जात होते.

मात्र, आज एक वर्षानंतर ही परिस्थिती पूर्णपणे पालटली आहे. वर्षभरापूर्वी भाजपमध्ये राज्यातील बड्या नेत्यांचे इनकमिंग सुरु होते. त्याच भाजपमधील एकनाथ खडसे यांच्यासारखा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची उत्तर महाराष्ट्रातील ताकद शतपटीने वाढणार आहे. याशिवाय, ओबीसी नेता म्हणून असलेली एकनाथ खडसे यांची ओळख राष्ट्रवादीला आगामी काळात फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा केली. नाथाभाऊ समर्थक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर जमा झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची उत्सुकता आहे. मुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार आहे.

रक्षा खडसे भाजपमध्येच? एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: मोदींकडून भ्रमनिरास झाल्याचे ‘ते’ रिट्विट एकनाथ खडसेंकडून डिलीट   

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना? 

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...