अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार उपमुख्यमंत्र्यांकडे, शासन निर्णय जारी

अण्णासाहेब पाटील या आर्थिक मागास महामंडळाचा कारभार अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.(Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Handover To Ajit Pawar)

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार उपमुख्यमंत्र्यांकडे, शासन निर्णय जारी
Namrata Patil

|

Nov 13, 2020 | 8:03 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अण्णासाहेब पाटील या आर्थिक मागास महामंडळाचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाकडे असलेले हे महामंडळ नियोजन खात्याकडे वर्ग करण्यात आलं आहे. नुकतंच याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Handover To Ajit Pawar)

शासन निर्णयात काय म्हटलं आहे?

“अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक आणि प्रशासकीय बाबींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाऐवजी नियोजन विभागाकडे देण्याचा निर्णय 9 जुलै 2020 रोजी सारथी संस्थेच्या बैठकीत घेण्यात आला होता. यानंतर हे महामंडळ कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाकडून हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरु होती.

अखेर ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अण्णासाहेब पाटील महामंडळाचा संपूर्ण कारभार सर्व योजनांसह कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाकडून नियोजन विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

यानुसार याविषयीचे सर्व प्रस्ताव सादर झाल्यानंतर ते या विभागाकडून वितरीत करण्यात येतील. मात्र नियोजन विभागाने यासाठी तात्काळ स्वतंत्र लेखाशिर्ष उपलब्ध करुन घ्यावे. विविध तरतुदी करण्यासाठी लेखाशिर्ष घेणे, त्यासाठी आवश्यक अर्थसंकल्पीय तरतूद करणे, पुरवणी मागणी करणे, निधी वितरीत करणे या अन्य बाबी यापुढे नियोजन विभागाने हाताळाव्यात.” असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

आठवड्यापूर्वीच महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त 

दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने नेमणूक केलेल्या या महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. यासाठी बुधवारी 4 नोव्हेंबरला आदेशही जारी करण्यात आला होता. त्यानंतर आता हे महामंडळ अजित पवारांकडे सोपवले गेले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर खरमरीत टीका केली होती. या टीकेनंतर ठाकरे सरकारकडून हे महामंडळातील अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं होतं.  (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Handover To Ajit Pawar)

संबंधित बातम्या : 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

अण्णासाहेब पाटील महामंडळाचं संचालक मंडळ बरखास्त केल्याचं वाईट वाटलं; नरेंद्र पाटील नाराज

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें