…तर उद्धव ठाकरेंना अटक करणार का; सर्वोच्च न्यायालयात हरीश साळवेंचा युक्तिवाद

अशाप्रकारे अटक करायला अर्णव गोस्वामी हे खुनी किंवा दहशतवादी आहेत का | harish salve in SC

...तर उद्धव ठाकरेंना अटक करणार का; सर्वोच्च न्यायालयात हरीश साळवेंचा युक्तिवाद
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 4:04 PM

नवी दिल्ली: रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab goswami ) यांच्या अंतरिम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत वकील हरीश साळवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी एसटीच्या कर्मचाऱ्याने वेतन न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांनी पगार न दिल्यामुळे या कर्मचाऱ्याला आत्महत्या करावी लागली. मग आता पोलीस उद्धव ठाकरे यांना अटक करणार का, असा सवाल अर्णव गोस्वामी यांचे वकील हरीश साळवे यांनी उपस्थित केला. (Arnab goswami bail plea hearing in SC)

सर्वोच्च न्यायालयात आज अर्णव गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनासाठी सुनावणी होत आहे. यावेळी अर्णव गोस्वामी यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. अर्णव गोस्वामी यांना ज्याप्रकारे अटक झाली, ती अटक करण्याची पद्धत आहे का? अशाप्रकारे अटक करायला अर्णव गोस्वामी हे खुनी किंवा दहशतवादी आहेत का, असा सवाल हरीश साळवे यांनी उपस्थित केला.

हा सदोष मनुष्यवधाचा खटला नाही. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरण मे 2020 पर्यंत शांत होते. त्यानंतर 21 एप्रिलला अर्णव गोस्वामी यांनी रिपब्लिक चॅनेलवरुन पालघरमधील साधुंच्या हत्येप्रकरणी राज्य सरकारवर टीका केली. यानंतर 26 एप्रिलला अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांनी राज्य सरकारला तपास सुरु करण्यासंदर्भात पत्र लिहले. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे हरिश साळवे यांनी म्हटले. तसेच अन्वय नाईक यांनी त्यांच्या आईची हत्या करून आत्महत्या केल्याचेही हरीश साळवे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.

अर्णव गोस्वामींच्या जामिनावर सुप्रीम कोर्टात इतक्या तातडीने सुनावणी कशी होते? रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab goswami ) यांच्या जामिनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होत असलेल्या तातडीच्या सुनावणीवर बार कौन्सिलचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्णव गोस्वामी यांना लगेचच कशी सुनावणी मिळते. अर्णव गोस्वामी यांच्यावर इतकी मेहरबानी का, असा सवाल दुष्यंत दवे यांनी उपस्थित केला आहे. संबंधित बातम्या:

सुशांतची सुसाईड नोट नव्हती, मात्र माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णवचं नाव, तरीही कारवाई का नाही? : नाईक कुटुंब

‘अर्णव गोस्वामींच्या जामिनावर सुप्रीम कोर्टात इतक्या तातडीने सुनावणी कशी होते, कित्येकजण तुरुंगात खितपत पडलेत’

BREAKING | रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार!, किरिट सोमय्या यांचा दावा, अर्णव गोस्वामी प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

(Arnab goswami bail plea hearing in SC)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.