AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birth Anniversary | गुन्हेगारांचा थरकाप उडवणारे, राजकारण्यांना घाम फोडणारे, शूर शहीद कामटे!

शहीद अशोक कामटे यांना बॉडी बिल्डिंग म्हणजे शरीरसौष्ठवाची कॉलेजपासून आवड होती. त्यांनी कुस्तीचा फड आणि जीम दोन्ही गाजवली. शरीरसौष्ठवात त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या. पोलीस पदकापासून ते यूएन पदकांपर्यंतची बक्षीसे मिळवली. ते कुस्तीच्या फडात उतरायचे तेव्हा भल्याभल्यांची भीतीने गाळण उडायची. त्यांनी मी-मी म्हणणाऱ्या पैलवानांना अस्मान दाखवले.

Birth Anniversary | गुन्हेगारांचा थरकाप उडवणारे, राजकारण्यांना घाम फोडणारे, शूर शहीद कामटे!
शहीद अशोक कामटे.
| Updated on: Feb 23, 2022 | 9:01 AM
Share

नाशिकः तुम्हाला 2008 मधील मुंबईवरील (Mumbai) दहशतवादी हल्ला (Terrorist attack) आठवत असेल. त्यात 166 जणांनी प्राण गमावले. करकरे, कामटे, साळस्कर हे तीन बहादूर अधिकारी शहीद झाले. त्याच आयपीएस अशोक कामटे (Ashok Kamte) यांची आज जयंती. त्यांचे नाव ऐकताच भल्याभल्या गुन्हेगारांना घाम फुटायचा. पैलवानांना ते फडात चित करायचे. कामटे हे पुण्यातल्या जांभळीचे. 23 फेब्रुवारी 1965 रोजी त्यांचा जन्म झाला. शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये झाले. पुढे 5 वर्षांसाठी ते कोडाई कॅनाल आंतराष्ट्रीय प्रशालेत होते. त्यांना कॅम्प रायझिंग सनमधून आंतराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी 1985 मध्ये सेंट झेवियर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. तर पदव्युत्तर शिक्षण सेंट स्टिफन्स कॉलेजमधून 1987 मध्ये पूर्ण केले. 1989 च्या बॅचमध्ये ते आयपीएस अधिकारी झाले.

कामटेंची वेगळी ओळख

कामटे यांची वेगळी ओळख म्हणजे ओलीस ठेवलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी दशहतवाद्यांशी संवाद साधण्याचे त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळेच मुंबई हल्ला झाला तेव्हा त्यांना या मोहिमेवर पाठवण्यात आले. मात्र, कामा हॉस्पिटलजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारत कामटे, करकरे आणि साळस्कर हे तीन शूर अधिकारी आपण गमावले. विशेष म्हणजे त्यांनी पेरू मध्ये झालेल्या Junior Power Lifting Championship मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

भंडाऱ्यात पहिली पोस्टिंग

कामटे यांना पहिली पोस्टिंग भंडारा येथे 1989 मध्ये मिळाली. ते या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक होते. त्यानंतर कोल्हापूर, ठाणे येथे त्यांनी काम केले. शांतीदूत म्हणून त्यांनी बोस्निया येथे देशाचे दीड वर्ष प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर मुंबईतील दशहतवाद आणि नक्षलवादविरोधी पथकात काम सुरू केले. 2007 मध्ये ते सोलापूरचे पोलीस आयुक्त होते. इथे त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली.

आमदाराला फरफटत नेले

कर्नाटकातल्या ईंडीचे तत्कालीन आमदार रविकांत पाटील यांनी त्यांचा वाढदिवस सोलापूरमध्ये जंगी वाजत-गाजत साजरा केलेला. खरे तर त्यावेळेस रात्री 10 नंतर फटाके वाजवण्यास बंदी होती. मात्र, आमदारांच्या कार्यकर्त्यांनी तो नियम पाळला नाही. पोलिसांनी सांगितले, तर त्यांचे ऐकले नाही. त्यांचा अपमान केला. हे अशोक कामटेंना कळाले. त्यांनी तातडीने रविकांत पाटलांचे घर गाठले. तिथे त्यांनाही अपमानास्पद वागणूक मिळाली. आमदारांनी कामटेंशी वाद घातला. प्रकरण झटापटीपर्यंत गेले. कामटेंच्या छातीवरील बॅज खाली पडला. तेव्हा त्यांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी आमदार रविकांत पाटील यांना कॉलर धरून फरफटत जीपमध्ये आणून टाकले. त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला. त्यामुळे सोलापूरकर त्यांचे नाव घेतले की चळाचळा कापायचे.

शरीरसौष्ठवात जिंकली बक्षीसे

कामटे यांना बॉडी बिल्डिंग म्हणजे शरीरसौष्ठवाची कॉलेजपासून आवड होती. त्यांनी कुस्तीचा फड आणि जीम दोन्ही गाजवली. शरीरसौष्ठवात त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या. पोलीस पदकापासून ते यूएन पदकांपर्यंतची बक्षीसे मिळवली. ते कुस्तीच्या फडात उतरायचे तेव्हा भल्याभल्यांची भीतीने गाळण उडायची. त्यांनी मी-मी म्हणणाऱ्या पैलवानांना अस्मान दाखवले. त्यांच्या जीवन कार्याचा प्रवास त्यांची पत्नी विनीता यांनी ‘टू द लास्ट बुलेट’ या पुस्तकातून मांडला आहे. त्यांना शहीद झाल्यानंतर सरकारने अशोक चक्र देऊन त्यांचा गौरव केला.

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.