धक्कादायक! भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख सुभाष अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

धक्कादायक! भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख सुभाष अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला

अकोला : अकोला जिल्ह्यातल्या उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हातरून इथल्या भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख सुभाष अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्यात सुभाष अग्रवाल जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मंगळवारी हातरुनला साप्ताइक बाजार होता. त्या दरम्यान ही घटना घडली. (Assault to BJP trade front chief Subhash Agarwal in akola)

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 9 वाजताच्या सुमारास सुभाष अग्रवाल हे त्यांच्या मेडिकलमध्ये बसले होते. यावेळी दोन अज्ञात युवकांनी त्यांना मारहाण करत चाकूच्या धाकावर अंदाजे 20 हजार रुपये लुटून नेले. या मारहाणीमध्ये अग्रवाल हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

सुभाष अग्रवाल हे घटना घडताच पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले असता आता नाही तर सकाळी तक्रार नोंदवू असं उत्तर पोलिसांनी दिलं. वेळीच तक्रार न घेतल्यामुळे आरोपी मोकाट फिरत असून शहरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

दरम्यान, चोरीच्या उद्देशाने हा हल्ला केला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी तात्काळ तक्रार नोंदवून घेत आरोपींना ताब्यात घ्यावं अशी सुभाष अग्रवाल यांची मागणी आहे. ऐन दिवाळी अशा चोरीच्या घटना घडत असल्याने नागिरकांमध्ये भीती आहे. त्यामुळे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष न करता वेळीच कारवाई करावी असं गावकऱ्याचंही म्हणणं आहे.

इतर बातम्या –

भाऊ-बहिणीचा अभ्यासाच्या तणावातून आत्महत्येचा प्रयत्न, बहिणीचा मृत्यू

हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; 50 जणांना अटक, 21 लाखांचा मुद्देमाल जप्त

(Assault to BJP trade front chief Subhash Agarwal in akola)

Published On - 6:47 am, Wed, 18 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI