औरंगाबादेत कोरोनाचा कहर, 24 तासात 42 जणांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोना विषाणूचा कहर पाहायला मिळत (Aurangabad Corona Positive Patient) आहे. औरंगाबादमध्ये गेल्या 24 तास 42 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

औरंगाबादेत कोरोनाचा कहर, 24 तासात 42 जणांना कोरोनाची लागण

औरंगाबाद : राज्यात कोरोना विषाणूचा कहर पाहायला मिळत (Aurangabad Corona Positive Patient) आहे. औरंगाबादमध्ये गेल्या 24 तास 42 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आज (30 एप्रिल) औरंगाबादेत आणखी 21 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा 151 वर पोहोचला आहे.

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Aurangabad Corona Positive Patient) आहे. औरंगाबादमध्ये काल (29 एप्रिल) दिवसभरात 21 रुग्ण आढळले होते. तर आज 21 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता कानन येळीकार यांनी याबाबतची माहिती दिली. औरंगाबादमध्ये गेल्या 24 तासात नव्या 42 रुग्णांची भर पडली आहे.

औरंगाबादमध्ये आतापर्यंत 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 23 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे औरंगाबाद जिल्ह्यात दोन दिवस कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी औरंगाबादमध्ये मेडिकल आणि रुग्णसेवा वगळत इतर सर्वकाही बंद राहणार आहेत. तसेच दूध, भाजीपाला आणि किराणामालासह सर्व अत्यावश्यक सेवाही ठराविक वेळेत चालू राहणार आहे. त्यामुळे औरंगाबादेत कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 9 हजार पार

महाराष्ट्रात काल (29 एप्रिल) 597 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 9 हजार 915 इतकी झाली आहे. उपचारानंतर बरे झालेल्या 205 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात 1 हजार 593 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 7 हजार 890 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी (Aurangabad Corona Positive Patient) दिली.

संबंधित बातम्या : 

मालेगावात ‘कोरोना’चा हाहा:कार, मध्यरात्रीत तब्बल 71 नवे रुग्ण, आकडा अडीचशेपार

आधी चार महिन्याच्या बाळाचा कोरोनावर विजय, आता पुण्यात पन्नाशीवरील 7 ज्येष्ठांनी कोरोनाला हरवलं

Published On - 1:44 pm, Thu, 30 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI