औरंगाबादेत कोरोनाचा कहर, 24 तासात 7 नव्या रुग्णांची नोंद

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना औरंगाबादेतही कोरोनाचा (Aurangabad Corona Update) कहर सुरुच आहे.

औरंगाबादेत कोरोनाचा कहर, 24 तासात 7 नव्या रुग्णांची नोंद
Follow us
| Updated on: Apr 25, 2020 | 9:25 AM

औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना औरंगाबादेतही कोरोनाचा (Aurangabad Corona Update) कहर सुरुच आहे. गेल्या 24 तासात औरंगाबादमध्ये 7 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. या सर्वांवर औरंगाबादेतील मिनी घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

औरंगाबादमध्ये आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची काल (25 एप्रिल) नोंद (Aurangabad Corona Update) करण्यात आली. गेल्या 24 तासात 7 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात एकाच कुटुंबातील तीन महिलांचा समावेश आहे. या तिन्ही महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

औरंगाबादमध्ये आतापर्यंत 47 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर औरंगाबादेतील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर दुसरीकडे औरंगबादेतील 6 पॉझिटिव्ह रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यांना त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

औरंगबाद शहरात आतापर्यंत 47 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील जिल्हा रुग्णालयातील 14 तर खासगी रुग्णालयातील 2 अशा 16 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

तर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मराठवाड्यातील 8 पैकी 3 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहे. तर औरंगबाद वगळता इतर 4 जिल्ह्यांमध्येही कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील किमान 7 जिल्हे लवकरचं कोरोनावर मात करण्याची शक्यता आहे.

राज्यातील स्थिती काय?

महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 817 वर पोहचली आहे. काल (24 एप्रिल) दिवसभरात एकूण 394 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 117 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत राज्यभरात 957 रुग्ण बरे झाले आहेत. तर, एकूण 5 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत महाराष्ट्रात 1 लाख 2 हजार 189 कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी 94 हजार 485 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले, तर 6 हजार 817 जण पॉझिटिव्ह आले (Aurangabad Corona Update) आहेत.

संबंधित बातम्या : 

पुण्याची धाकधूक वाढली, दोन दिवसात 208 नवे कोरोना रुग्ण आणि 8 मृत्यू

वाशिम जिल्हा कोरोनामुक्त, जिल्ह्यातील एकमेव रुग्ण कोरोना निगेटिव्ह

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.