घुसखोरांची माहिती द्या आणि पैसे कमवा, औरंगाबाद मनसेकडून घसघशीत इनाम

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या औरंगाबाद विभागाकडून पाच हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे

घुसखोरांची माहिती द्या आणि पैसे कमवा, औरंगाबाद मनसेकडून घसघशीत इनाम

औरंगाबाद : पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या हकालपट्टीचा चंग बांधलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी शक्कल लढवली आहे. घुसखोरांची माहिती देणाऱ्यांना औरंगाबादमधील मनसेकडून घसघशीत इनाम देण्यात येणार आहे. (Aurangabad MNS Bangladeshi Intruder)

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या औरंगाबाद विभागाकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तींना पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. घुसखोरांविषयी माहिती मनसेकडून पोलिसांना दिली जाणार आहे.

घुसखोरांविषयी माहिती देण्यासाठी औरंगाबाद शहरातील आकाशवाणी चौकात विशेष स्टॉल उभारण्यात आला आहे. तिथे गुप्त पद्धतीने माहिती देण्याचीही सोय असेल. माहिती खरी ठरल्यास संबंधित व्यक्तीला पाच हजार रुपये देण्यात येतील, अशी घोषणा औरंगाबाद मनसेकडून करण्यात आली आहे.

मनसेची धडक मोहीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बांगलादेशी घुसखोरांविरोधात शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत विरार, बोरीवली आणि नालासोपाऱ्यातील अनेक बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. घुसखोरांविरोधात मनसेने मुंबईत 9 फेब्रुवारी 2020 रोजी मोर्चादेखील काढला होता.

मनसेची विरार-बोरीवलीनंतर ठाण्यात धाड

बोरीवली पूर्व चिकूवाडी परिसरात बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेने 13 फेब्रुवारीला सकाळी आंदोलन केलं होतं. या भागात अनेक दिवसांपासून काही बांगलादेशी महिला आणि पुरुष राहत असल्याचा स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांचा दावा होता. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चिकूवाडीतील झोपडपट्टी परिसरात शोध मोहीम राबवत लोकांची चौकशी केली. त्यांची कागदपत्रंही तपासली. त्यांचा पेहराव आणि बोलीभाषा बांगलादेशींसारखी असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं.

हेही वाचामनसेचे ‘बांगलादेशी’ भारतीय निघाले, पीडितांची मनसैनिकांविरोधात पोलीस तक्रार

पुण्यात मनसेने पकडलेले संशयित हे बांगलादेशी नसून भारतीयच असल्याचं उघड झालं होतं. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासामुळे मनसेच्या दाव्यातील हवा निघाली होती. त्यानंतर पीडित कुटुंबाने मनस्तापाविरोधात कायदेशीर लढाईला सुरुवात केली. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. (Aurangabad MNS Bangladeshi Intruder)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI