औरंगाबादेत नगरसेवकांची संख्या वाढणार, 115 नगरसेवकांची संख्या 133 वर जाणार, आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापालिकेतील सदस्यांची संख्या 15 टक्क्यांनी वाढण्याचा निर्णय होऊ शकतो. हा निर्णय झाल्यास औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 115 वरून 133 वर जाईल.

औरंगाबादेत नगरसेवकांची संख्या वाढणार, 115 नगरसेवकांची संख्या 133 वर जाणार, आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
महापालिका निवडणुकीसाठीच्या कामांना वेग
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 10:56 AM

औरंगाबादः महापालिकेतील नगरसेवकांची (Corporates)  संख्या यंदा 15 टक्क्यांनी वाढणार असून हा आकडा 115 वरून 133 वर जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी होणाऱ्या बैठकीत याविषयीचा निर्णय होणार आहे. यात महापालिकेत (Aurangabad Municipal corporation) निवडून येणाऱ्या सदस्यांच्या संख्येत वाढ करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

यंदा बहुदस्यीय प्रभाग रचना

राज्य शासनाने महापालिका निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार तीन वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या निर्णयावर राज्य निवडणूक आयोदाने शिक्कामोर्तब करून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महापालिकांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रभाग रचनेचे काम सुरु करण्यात आले आहे. या रचनेचे काम झाल्यानंतर शासन आता महापालिकेत निवडून येणाऱ्या संदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेणार आहे.

नगरविकास खात्याचा प्रस्ताव बैठकीत मांडणार

आज बुधवारी मुंबईत होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरविकास खात्याने प्रभाग रचनेसंबंधीचा तयार केलेला प्रस्ताव मांडला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ बैठकीसाठीच्या विषयपत्रिकेवर महापालिकेतील सदस्य संख्या वाढवण्याचा प्रस्ताव नवव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या बैठकीत माहापालिकेतील सदस्यांची संख्या 15 टक्क्यांनी वाढण्याचा निर्णय होऊ शकतो. हा निर्णय झाल्यास औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 115 वरून 133 वर जाईल. सध्या शहरातील पालिकेत 115 नगरसेवक आहेत.

औरंगाबाद महापालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना – 29 भाजप – 22 एमआयएम – 25 कॉंग्रेस – 10 राष्ट्रवादी – 03 बसप – 05 रिपब्लिकन पक्ष – 01 अपक्ष – 18

एप्रिल-मे महिन्यात निवडणुकीची शक्यता

राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला अनुभव अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या समितीद्वारे 2011 मधील लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून नवीन प्रभाग रचना करावी, असे यात सांगण्यात आले आहे. शहरातील 115 वॉर्डांमध्ये एकूण 38 प्रभाग असतील. 3 वॉर्डांचे 37 तर आणखी एक प्रभाग 4 वॉर्डांचा असेल. ही तयारी सुरु झाल्यानंतर महापालिकेची निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या-

स्मार्ट सिटी औरंगाबादचे काम आता ऑनलाइन, नोव्हेंबर अखेरपर्यंत मनपाच्या विविध सेवा डिजिटल स्वरुपात

औरंगाबादेत अनोखी करवा चौथ, विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या पतींना पत्नींकडून हेल्मेटची भेट

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.