वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना गुलाब, न पाळणाऱ्यांना नियमावलीचे पत्रक, पोलिसांची अनोखी मोहीम

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांसाठी औरंगाबाद शहर वाहतूक पोलिसांनी आगळी वेगळी मोहीम हाती (Traffic Police launch special campaign) घेतली आहे.

वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना गुलाब, न पाळणाऱ्यांना नियमावलीचे पत्रक, पोलिसांची अनोखी मोहीम
Namrata Patil

|

Nov 19, 2019 | 5:10 PM

औरंगाबाद : वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांसाठी औरंगाबाद शहर वाहतूक पोलिसांनी आगळी वेगळी मोहीम हाती (Traffic Police launch special campaign) घेतली आहे. नेहमी दंड लावूनही अनेक वाहन चालक नियम पाळत नसल्याने वाहतूक पोलिस आता गांधीगरी करताना दिसत (Traffic Police launch special campaign) आहेत. जे वाहतुकीचे नियम नियमित पाळतात, त्यांना गुलाबाचे पुष्प दिले जात आहेत. तर जे नियम पाळत नाही त्यांनी नियमावलीचे पत्रक शहरातील विविध सिग्नलवर पोलीस देत (Traffic Police launch special campaign) आहेत.

नोव्हेंबर महिन्यातील तिसरा रविवार हा अपघात ग्रस्तांचा स्मृतीदिन म्हणून पाळला जातो. या दिवसांच्या अनुषंगाने औरंगाबाद वाहतूक पोलिसांनी अभिनव उपक्रम राबवला आहे. वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध रहदारी असलेल्या भागात नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केलं.

तर नियम तोडणाऱ्या वाहन चालकांना नियमावलींचे पत्रक देण्यात आले. त्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आणि शिक्षेची तरतूद याबाबत माहिती देण्यात आली (Traffic Police launch special campaign) आहे.

ही मोहीम राबवत असताना पोलिसांनी वाहतूक नियमाबाबत जनजागृती केली आहे. हे नियम मोडल्याने अपघात होतात. अपघात टाळल्याचे असल्यास वाहन चालकाने नियमांचे पालन केले पाहिजे. असे पोलिस कर्मचाऱ्यांनी नागरिकांना गांधीगिरी करत (Traffic Police launch special campaign) सांगितले. विशेषत: विना हेल्मेट ट्रिपल सीट किंवा मद्य प्राशन करुन गाडी चालवल्यास लागणारा दंड आणि होणारी शिक्षा याबाबत लोकांना सतर्क करण्याचे काम औरंगाबाद वाहतूक पोलिसांनी करत  आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें