वॉशिंग मशीन वापरताना ‘या’ 5 चुका नक्की टाळा, नाहीतर मोठा धोका
वॉशिंग मशीन हे घरगुती जीवन सुलभ करणारे उपकरण आहे, पण त्याचा वापर करताना ‘फक्त बटण दाबून सोडून देणं’ ही चुकीची कल्पना आहे. योग्य काळजी न घेतल्यास ते केवळ खर्चिक ठरू शकतेच, पण अपघातालाही निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे वरील गोष्टी लक्षात घेऊन वॉशिंग मशीन वापरल्यास, ती दीर्घकाळ चालेल आणि सुरक्षित राहील

आजच्या घराघरात वॉशिंग मशीन ही गरजेची गोष्ट झाली आहे. परंतु, ही एक अशी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, जिचा वापर पाण्याच्या संपर्कात येऊन होतो – आणि हीच बाब खूप काळजी घेण्यास भाग पाडते. कारण इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि पाणी एकत्र आले, तर थोडीशी चूकही मोठा धोका निर्माण करू शकते. अनेक जण वॉशिंग मशीन वापरताना छोट्या-छोट्या चुका करतात, ज्या नंतर मोटर बर्न होणं, धूर निघणं किंवा टोकाच्या परिस्थितीत मशीन ब्लास्ट होण्यास कारणीभूत ठरतात. अशा काही सामान्य पण घातक चुकांबाबत जाणून घेऊया.
ड्रेन पाइप वर ठेवणं
खूप वेळा लोक वॉशिंग मशीनच्या ड्रेन पाइपमधून पाणी लीक होताना पाहतात आणि त्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून पाइप वर हुकला अडकवतात. पण ही एक अतिशय चुकीची आणि धोकादायक सवय आहे. पाण्याचा प्रवाह योग्य रितीने न झाल्यास तो मोटरपर्यंत पोहोचू शकतो आणि मोटरमधून धूर निघणं किंवा शॉर्ट सर्किट होणं शक्य आहे. त्यामुळे पाइपमधून पाणी गळत असेल, तर लगेच प्रोफेशनल सर्व्हिस घेणं गरजेचं आहे, नुसता पाइप उंच ठेवणं हा पर्याय नाही.
सर्फ जास्त वापरणं
ज्यांना वाटतं की जास्त सर्फ वापरल्यास कपडे स्वच्छ होतील, त्यांनी सावध व्हावं. जास्त डिटर्जंटचा वापर मशीनमध्ये थर साचवतो, जो वेळेच्या ओघात मशीनचे भाग अडकवतो आणि कपड्यांवर पांढरे डाग दिसू लागतात. यासाठी पावडरच्या ऐवजी लिक्विड डिटर्जंट वापरणं योग्य, आणि तेही मोजून.
बाथरूममध्ये मशीन ठेवणं
काही घरांमध्ये जागेच्या अभावामुळे वॉशिंग मशीन बाथरूममध्ये ठेवावी लागते. परंतु, बाथरूममध्ये सतत आर्द्रता आणि पाण्याचा संपर्क असल्यामुळे मशीनची बॉडी लवकर गंजू शकते आणि कंट्रोल पॅनेल देखील खराब होऊ शकतो. जर बाथरूममध्ये मशीन ठेवणं अपरिहार्य असेल, तर स्टँड आणि कव्हर वापरणं आवश्यक आहे, जेणेकरून मशीनचे नुकसान टाळता येईल.
ओव्हरलोडिंग
खूप लोक कपडे इतके भरतात की त्यांना पाण्यात फिरायलाही जागा उरत नाही. यामुळे मोटर आणि गिअरबॉक्सवर जास्त ताण येतो, आणि काही काळातच मशीन बिघडते. एक साधा नियम लक्षात ठेवा कपडे क्लॉक आणि अँटी-क्लॉकवाइज फिरतायत का? जर नाही, तर कपडे कमी करा.
स्पिन करताना सावध
सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये कपडे वेगळ्या टबमध्ये टाकून स्पिन करावे लागतात. गीले कपडे जर एकमेकात गुंतलेले टाकले, तर स्पिनरचा बॅलन्स बिघडतो आणि मशीनचे आतील भाग तुटण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक कपडा सुटका करून नीट टाकणं आवश्यक आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
