Baba Ka Dhaba | ‘ढाबा’ मालक कांता प्रसाद यांची पोलीस ठाण्यात धाव, प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या युट्यूबरविरोधात तक्रार!

‘बाबा का ढाबा’चे मालक, कांता प्रसाद यांनी त्यांना प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या युट्यूबर विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Baba Ka Dhaba | ‘ढाबा’ मालक कांता प्रसाद यांची पोलीस ठाण्यात धाव, प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या युट्यूबरविरोधात तक्रार!
Harshada Bhirvandekar

|

Nov 02, 2020 | 12:10 PM

मुंबई : एका व्हायरल व्हिडीओमुळे दिल्लीच्या मालवीय नगर मधील ‘बाबा का ढाबा’ (Baba Ka Dhaba) रातोरात प्रसिद्ध झाला. कोरोना काळात उदरनिर्वाह ठप्प झाल्याने ‘बाबा का ढाबा’ चालवणारे 80 वर्षीय वृद्ध दांपत्य अक्षरशः हालाखीचे जीवन जगत होते. मात्र, युट्यूबर गौरव वासनने या दांपत्याचा केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यांच्या ढाब्यावर अक्षरशः लोकांची रीघ लागली. मात्र, आता या ‘बाबा का ढाबा’चे मालक, कांता प्रसाद यांनी त्यांना प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या युट्यूबर विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.(Baba Ka Dhaba owner kanta Prasad files complaint against youtuber Gaurav Wasan)

‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांनी गौरव वासनवर पैशांच्या हेराफेरीचा आरोप लावला आहे. काही दिवसांपूर्वी युट्यूबर लक्ष्य चौधरीने देखील गौरववर असाच आरोप केला होता. त्यानंतर आता कांता प्रसाद यांनी देखील कारवाईचे मोठे पाऊल उचलल्याने सगळ्यांच्या नजरा विस्फारल्या आहेत.

काय केली तक्रार?

‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांच्या तक्रारीत त्यांनी गौरवने पैशांची हेराफेरी केल्याचे म्हटले आहे. गौरवने कांता प्रसाद यांचा व्हिडीओ तयार करताना सगळ्यांना मदतीचे आवाहन केले होते. या मदत निधीसाठी त्यांने स्वतःच्या खात्याचा तपशील दिला होता. मात्र, हे पैसे आपल्यापर्यंत पोहचलेच नसून, गौरवने हडप केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली. मात्र, अद्याप गौरव वासनविरोधात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.(Baba Ka Dhaba owner kanta Prasad files complaint against youtuber Gaurav Wasan)

व्हिडीओमुळे मिळाली प्रसिद्धी

दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये हा ‘बाबा का ढाबा’ आहे. कांता प्रसाद हे वृद्ध गृहस्थ आपल्या पत्नीसह हा ढाबा चालवतात. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. लोक पूर्वीसारखे ढाब्यावर येत नसल्याने कांता प्रसाद यांच्यासमोर दैनंदिन गुजराण कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला होता.

गौरव वासनने कांता प्रसाद यांची विचारपूस केली तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. यानंतर एका युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत कांता प्रसाद यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. अनेक सेलिब्रिटीजनी हा व्हिडीओ रिट्विट करत कांता प्रसाद यांना मदत करण्याची विनंती केली होती. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघानेही हा व्हीडिओ रिट्विट केला होता.

त्यामुळे साहजिकच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे आता कांता प्रसाद यांच्या ‘बाबा का ढाबा’वर चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी दिल्लीकरांची रीघ लागल्याचे चित्र आहे. याशिवाय, अनेकजण कांता प्रसाद यांना आर्थिक मदत करण्यासाठीही पुढे सरसावले आहेत.

(Baba Ka Dhaba owner kanta Prasad files complaint against youtuber Gaurav Wasan)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें