दापोलीत संरक्षक जाळीत अडकून कासवांच्या पिल्लांचा मृत्यू

कासव संरक्षण मोहिमेत वनविभागाचा हलगर्जीपणामुळे अनेक निष्पाप कासवांच्या पिल्लांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीच्या दापोलीत घडली.

दापोलीत संरक्षक जाळीत अडकून कासवांच्या पिल्लांचा मृत्यू

रत्नागिरी : कासव संरक्षण मोहिमेत वनविभागाचा (Baby Tortoise Died Conservation Centre) हलगर्जीपणामुळे अनेक निष्पाप कासवांच्या पिल्लांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीच्या दापोलीत घडली. याठिकाणी कासव संवर्धन केंद्राकडून य कासवांच्या संरक्षणासाठी जाळी लावण्यात आली होती. मात्र, ज्या कासवांच्या संरक्षणासाठी ही जाळी उभरण्यात आलेली त्याच जाळीत अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर (Baby Tortoise Died Conservation Centre) प्राणीप्रेंमी संताप व्यक्त करत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ किनाऱ्यावरच्या कासवांचं संरक्षण केलं जातं. त्यासाठी किनाऱ्यावर संवर्धन केंद्र उभारली गेली आहेत. ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांची अंडी या कासव संवर्धन केंद्रात संवर्धित केली जात आहेत.

हेही वाचा : खोकायचं कसं, शिंकायचं कसं? हात स्वच्छ धुणे म्हणजे नेमकं काय? पुणे विभागीय आयुक्तांच्या सोप्या टिप्स

मात्र, वनविभागाने कासवांची पिल्ले बाहेर येण्याच्या (Baby Tortoise Died Conservation Centre) तारखेकडे दुर्लेक्ष केलं आणि कासवांचा त्यांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळीत अडकून अनेक नवजात कासवांच्या पिल्लांचा मृत्यू झाला.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. पर्यटकांच्या निदर्शनास आल्यामुळे ही घटना समोर आली. वनविभागाचा निष्काळजीपणा कासवांच्या जीवावर बेतला. कासव संवर्धन केंद्राकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्यामुळे या निष्पाप कासवांचे पक्षांनी लचके तोडले.

सुमारे 100 पेक्षा अधिक कासवांची पिल्ले या ठिकाणी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कासवांच्या संवर्धनासाठी शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च होत असतो. त्यामुळे आता या कासवांच्या पिल्लांच्या मृत्यूचं काय? असा सवाल (Baby Tortoise Died Conservation Centre) प्राणी प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

संबंधित बातम्या :

Corona Virus | महाराष्ट्रातही कोरोनाचा शिरकाव, कोरोनाला रोखण्यासाठी 10 सोपे उपाय

‘गो कोरोना गो’वर रामदास आठवलेंची पहिली प्रतिक्रिया

VIDEO : खासदार नवनीत राणा यांचा आदिवासी महिलांसोबत ठेका

दोन सख्ख्या बहिणींचं अपहरण, मजूर बापाकडे अपहरणकर्त्यांची दोन कोटींच्या खंडणीची मागणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI