AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

392 विकेट्स घेणाऱ्या बांगलादेशी क्रिकेटपटूची 2 वर्षांपासून ब्रेन ट्युमरशी झुंज, संघसहकारी आर्थिक मदतीसाठी धावले

बांगलादेशचा क्रिकेटपटू मुशर्रफ हुसेन रुबेल याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

392 विकेट्स घेणाऱ्या बांगलादेशी क्रिकेटपटूची 2 वर्षांपासून ब्रेन ट्युमरशी झुंज, संघसहकारी आर्थिक मदतीसाठी धावले
Mosharraf Hossain Rubel
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 12:30 PM
Share

ढाका : बांगलादेशचा क्रिकेटपटू मुशर्रफ हुसेन रुबेल याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. रुबेल गेल्या दोन वर्षांपासून ब्रेन ट्यूमरशी लढत आहे. रुबेलने 2008 ते 2016 पर्यंत बांगलादेशसाठी 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. (Bangladesh Cricketer Mosharraf Hossain Rubel Battles with Brain Tumor, Has Been Taken To ICU)

बांगलादेशच्या मीडिया रिपोर्टनुसार, रुबेलच्या कौटुंबिक सूत्रांनी सांगितले की, मुशर्रफ हुसेन रुबेल याची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्याला बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर सध्या त्याच्यावर ICU मध्ये उपचार करत आहेत. डावखुरा फिरकीपटू रुबेल मार्च 2019 पासून ब्रेन ट्यूमरशी झुंज देत आहे.

एका अहवालात म्हटले आहे की, मुशर्रफ हुसेन रुबेल रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आल्यापासून, तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना सुरू झाल्या आहेत. बांगलादेशचा माजी कर्णधार मशरफी बिन मोर्तझा याने त्याच्या फेसबुक पेजवर लिहिले, “माझ्या मित्रा रुबेल, तू लवकरात लवकर बरा व्हावास यासाठी मी अल्लाहकडे प्रार्थना करतो. तू मैदानात परतावा याची मी वाट पाहात आहे. तू लवकर बरा हो.

दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि अनेक देशांतर्गत संघ ज्यांचे रुबेलचे प्रतिनिधित्व केले आहे, त्याला आर्थिक मदत देण्यासाठी पुढे आले आहेत. तसेच त्याचे संघातील सहकारीदेखील मदतीसाठी पुढे आले आहेत.

मुशरफ हुसेन रुबेलची अष्टपैलू कामगिरी

मुशरफ हुसेन रुबेलने 9 मार्च 2008 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने 7 ऑक्टोबर 2016 रोजी इंग्लंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यात त्याने 4 बळी मिळवले आहेत.

रुबेलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 392 विकेट्स आहेत. याशिवाय त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 3305 धावादेखील केल्या आहेत. यात त्याने दोन शतके आणि 16 अर्धशतके झळकावली आहेत.

देशांतर्गत टी-20 स्पर्धांमध्ये 56 सामन्यांमध्ये त्याने विविध संघांचे प्रतिनिधीत्व केले आहे. यात त्याने 60 विकेट्स घेतल्या आहेत. 104 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 120 विकेट्स आहेत.

इतर बातम्या

T20 World Cup मध्ये 7 भारतीय क्रिकेटपटूंचं पदार्पण, पाकिस्तानला भिडून चौघे दाखवणार रुबाब

T20 World Cup मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताला खास संदेश, दिग्गज भारतीय क्रिकेटपटू काय म्हणाला?

आधी तोरा मिरवला पण शेवटी वठणीवर आले, पाकड्यांच्या जर्सीवर आता सन्मानाने दिसतोय ‘इंडिया’

(Bangladesh Cricketer Mosharraf Hossain Rubel Battles with Brain Tumor, Has Been Taken To ICU)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.