बारामती पोलिसांची दमदार कामगिरी, विविध गुन्ह्यातील सराईत आरोपींना अटक, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

बारामती शहर पोलिसांनी चोरीसह चंदन तस्करी आणि घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा पर्दाफाश केला आहे. (Baramati City Police arrested seven accused in various crimes)

बारामती पोलिसांची दमदार कामगिरी, विविध गुन्ह्यातील सराईत आरोपींना अटक, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे: बारामती शहर पोलिसांनी चोरीसह चंदन तस्करी आणि घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा पर्दाफाश केला आहे. विविध गुन्ह्यामधील तब्बल सात आरोपींना पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून मोबाईल, सोने, चंदन आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा तब्बल 14 लाखांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी दिली आहे. (Baramati City Police arrested seven accused in various crimes)

बारामती शहर पोलिसांनी एका चोरीच्या प्रकरणाचा तपास करताना आरोपी बेरड्या संदीप भोसलेला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं जवळपास सात ते आठ घरफोड्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून 2 लाख 62 रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत.

मोबाईलच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने 41 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल चोरी केल्याची घटना उघड झाली आहे. बालाजी अनिल माने असं या आरोपीचे नाव आहे. बालाजीने त्याच्या मित्रांना साथीला घेऊन चोरी केली होती. बारामतीमध्ये निरंजन पारख यांचं मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. 11 तारखेच्या रात्री दुकानाचा दरवाजा उचकटून ही चोरी झाली होती. या घटनेचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात झाला होता.पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास करुन सहापैकी 3 आरोपींना अटक केली असून 3 आरोपी अद्याप फरार आहेत.

बारामती शहर पोलिसांनी अमित अनिल धेंडे या व्यक्तीला गांजा तस्करीप्रकरणी अटक केली. अमित धेंडे याच्याकडून  १२ हजार रुपयांचा गांजा जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

चंदन तस्करी प्रकरणी सचिन नवनाथ शिंदे यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चंदनाचे लाकूड आणि गुन्ह्यात वापरलेली झायलो कार जप्त केली.

संबंधित बातम्या:

Beed Acid Attack : प्रेयसीला अ‌ॅसिड टाकून जाळणाऱ्या नराधमाला नांदेडमध्ये अटक

लिव्ह इनमध्ये राहात असलेल्या प्रियकराचा अ‍ॅसिड हल्ला, प्रेयसीचा दुर्दैवी मृत्यू

(Baramati City Police arrested seven accused in various crimes)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI