Lockdown : भिवंडीतून उत्तर प्रदेशात कामगारांना घेऊन जाणारा कंटेनर पकडला, 60 कामगार ताब्यात

भिवंडी येथून उत्तर प्रदेश येथे कंटेनरमध्ये बसून गावी जाणाऱ्या तब्बल 60 कामगारांना पकडण्यात आलं आहे.

Lockdown : भिवंडीतून उत्तर प्रदेशात कामगारांना घेऊन जाणारा कंटेनर पकडला, 60 कामगार ताब्यात
Follow us
| Updated on: Apr 21, 2020 | 9:29 AM

भिवंडी : कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सुरुवातीला 21 दिवसांच्या (Bhiwandi Migrants ) लॉकडाऊनची घोषणा करत सार्वजनिक आणि मालवाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. मात्र, तरीही उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार या राज्यात कंटेनर आणि ट्रकमध्ये चोरीच्या मार्गाने स्थलांतरीत मजूर कामगार जात असताना पकडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस आल्या. त्यानंतर 14 एप्रिलपासून पुन्हा एकदा लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे स्थलांतरीत मजूर कामगारांचा संयम संपला आणि पुन्हा एकदा भिवंडी येथून उत्तर प्रदेश येथे कंटेनरमध्ये बसून गावी जाणाऱ्या तब्बल 60 कामगारांना पकडण्यात आलं आहे. या कामगारांना कंटेनरसह (Bhiwandi Migrants ) ताब्यात घेण्याची कारवाई शांतीनगर पोलिसांनी केली आहे.

भिवंडी शहरातील लकडा मार्केट नवीबस्ती या भागातून एक कंटेनर उत्तर प्रदेश राज्यातील बस्ती आणि सिद्धार्थ नगर येथील कामगारांना भरुन घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक शांतीनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा टेमघर पाईपलाईन या ठिकाणी सदरचा कंटेनर थांबवून त्याची तपासणी केली. तेव्हा या कंटेनरमध्ये तब्बल 60 जण दाटीवाटीने बसून आपल्या गावी निघाल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे या कंटेनरमध्ये फक्त एक महिला आपल्या दोन चिमुरड्यांसाह गावी निघाली होती. तर इतर सर्व हे पुरुष होते (Bhiwandi Migrants).

लॉकडाऊनमुळे भिवंडी शहरातील उद्योग-व्यवसाय बंद झाले. त्यामुळे या स्थलांतरीत कामगारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली. आपल्या गावी परत जाण्यासाठी या कामगारांनी कोणी हजार, तर कोणी दोन हजार रुपये या प्रवासासाठी कंटेनर चालकास दिले होते. एका व्यक्तीने स्वतः जवळ पैसे नसल्याने गावावरुन पैसे मागवून एक हजार भरपाई भाड्यापोटी कंटेनर चालकास दिले, असल्याची माहिती या कंटेनरमधील कामगारांनी दिली आहे.

राज्यातील स्थिती काय?

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. काल (20 एप्रिल) महाराष्ट्रात नव्या 466 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्याचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत आज 308 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 4 हजार 666 वर पोहोचला आहे. देशाची राजधानी असलेल्या मुंबईत आज 308 नव्या रुग्णांची रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईतील धारावी परिसरात 30 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे धारावी परिसरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 168 वर पोहोचली आहे. तर दादरमध्ये 2 नवे कोरोना रुग्ण आढळले (Bhiwandi Migrants ) आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 032 वर पोहोचला आहे.

संबंधित बातम्या :

मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करणार : राजेश टोपे

महाराष्ट्रातील 81 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच नाहीत : आरोग्य मंत्री

सोलापुरात कोरोनाचा विळखा वाढला, दिवसभरात 10 नवे कोरोनाबाधित रुग्ण

Corona Update | मुंबईतील कोरोनाचा आकडा 3032 वर, राज्यात 4666 रुग्ण

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.