अमेरिकेच्या ‘या’ निर्णयाने भारताला हजारो कोटींचा फटका

नवी दिल्‍ली : अमेरिकेचे प्रमुख डोनाल्‍ड ट्रम्प यांनी भारताचा व्यापारात प्राधान्य (GSP) देण्याचा दर्जा रद्द केल्याने भारताला हजारो कोटींचा फटका बसणार आहे. व्‍हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार 5 जून 2019 रोजी हा दर्जा समाप्‍त होईल. भारताच्या बाजारपेठेत अमेरिकेला समान संधी देण्याचे आश्वासन न दिल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प म्हणाले, “भारताने अमेरिकेला भारतीय बाजारपेठेत […]

अमेरिकेच्या ‘या’ निर्णयाने भारताला हजारो कोटींचा फटका
Follow us
| Updated on: Jun 01, 2019 | 11:57 AM

नवी दिल्‍ली : अमेरिकेचे प्रमुख डोनाल्‍ड ट्रम्प यांनी भारताचा व्यापारात प्राधान्य (GSP) देण्याचा दर्जा रद्द केल्याने भारताला हजारो कोटींचा फटका बसणार आहे. व्‍हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार 5 जून 2019 रोजी हा दर्जा समाप्‍त होईल. भारताच्या बाजारपेठेत अमेरिकेला समान संधी देण्याचे आश्वासन न दिल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

ट्रम्प म्हणाले, “भारताने अमेरिकेला भारतीय बाजारपेठेत न्याय्य आणि तर्कसंगत संधी देण्याचे आश्वासन दिलेले नाही. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला असून तो योग्य आहे. 5 जून 2019 पासून भारताचा व्यापार प्राधान्याबाबतचा दर्जा रद्द करण्यात येईल.”

भारताने अमेरिकेच्या कंपन्यांना बाजारपेठेत योग्य संधी दिली, तर भारताला अमेरिकेकडून व्यापारात फायदा मिळू शकतो, असे मत अमेरिकेच्या एका वरिष्‍ठ अधिकाऱ्याने सांगितले. संबंधित अधिकारी म्हणाले, “जर भारताने अमेरिकी कंपन्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारात मदत होईल असे डाटा लोकलायजेशनसह अन्य ई-कॉमर्ससंबंधित महत्त्वाचे निर्णय घेतल्यास भारत आणि अमेरिका सोबत येऊन चांगली प्रगती करु शकतो.”

भारत GSP चा सर्वात मोठा लाभार्थी

अमेरिकेने विकसनशील देशांना त्यांच्या आर्थिक विकासासाठी एका मर्यादेपर्यंत करमुक्त निर्यात करता यावी यासाठी ‘जनरलाईज सिस्टम ऑफ प्रेफरन्स’ (GSP) हा कार्यक्रम सुरु केला आहे. भारत GSP अंतर्गत फायदा घेणारा सर्वात मोठा देश आहे. भारत यामुळे 5.6 बिलियन डॉलर मूल्‍याच्या उत्पादनांची विनाशुल्क अमेरिकेत निर्यात करु शकत होता. मात्र, 5 जूनपासून भारताला याचा लाभ घेता येणार नाही.

दरम्यान, ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्यास भारताने देखील अमेरिकेच्या 20 पेक्षा अधिक कंपन्यांच्या उत्पादनावरील आयात कर वाढवण्याचा इशारा दिला होता.

Non Stop LIVE Update
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.