AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना कोरोना, एम्समध्ये दाखल

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सुशीलकुमार मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. (Bihar Deputy CM Sushil Kumar Modi tested corona positive)

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना कोरोना, एम्समध्ये दाखल
| Updated on: Oct 22, 2020 | 3:00 PM
Share

पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. (Bihar Deputy CM Sushil Kumar Modi tested corona positive)

मागील दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवत होती. कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, कोणतीही अडचण नाही, मागील दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. सध्या पाटणामधील एम्स रुग्णालयात दाखल झालो असून सीटीस्कॅन रिपोर्ट नॉर्मल आल्याची माहिती सुशीलकुमार मोदींनी दिली.

कोरोनातून बरं होऊन लवकरच पुन्हा बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार असल्याचे सुशीलकुमार मोदींनी म्हटले. सुशीलकुमार मोदी बिहारमधील महत्वाचे नेते आहेत. भाजपने आजचं बिहार निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 28 आक्टोबरला होणार आहे. भाजप आणि जदयू एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑक्टोबरपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. भाजप आणि जदयुच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी 12 सभा घेतील. बिहारमध्ये भाजप नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक रिंगणात आहे.

दरम्यान, बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7  नोव्हेंबर अशी तीन टप्प्यांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानंतर 10 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

संबंधित बातम्या:

सत्ता दिल्यास मोफत लस देऊ; बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपचं आश्वासन

बिहार विधानसभा निवडणुकीतील तीन कट्टर विरोधक एकत्र! काय आहे कारण?

(Bihar Deputy CM Sushil Kumar Modi tested corona positive)

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.