Sushant Death Case | बिहार पोलिसांच्या तपासाचा धडाका, आधी कोटक बॅंकेत तपास, मग अंकिताचा जबाब

सुशांतचा आर्थिक व्यवहार, सुशांतच्या मृत्यूचे कारण सांगणारे साक्षीदार शोधणे आणि रियाच्या विरोधातील साक्षीदार शोधणे या तीन मुद्यांवर बिहार पोलीस तपास करत आहेत.

Sushant Death Case | बिहार पोलिसांच्या तपासाचा धडाका, आधी कोटक बॅंकेत तपास, मग अंकिताचा जबाब
Follow us
| Updated on: Jul 31, 2020 | 8:01 AM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात कालच्या दिवसात अनेक घडामोडी घडल्या. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बिहार पोलिसांनी तपासाचा धडाकाच लावला आहे. बिहार पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात सुशांतची मैत्रीण आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे महत्त्वाची साक्षीदार ठरणार आहे. (Bihar Police records Actress Ankita Lokhande statement in Sushant Singh Rajput Death Case)

बिहार पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांचं पथक परवा मुंबईत आलं. या पोलिसांना मुंबई पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, यानंतरही बिहार पोलिसांचा तपास तसूभरही थांबला नाही. दिवसरात्र त्यांचा तपास सुरुच आहे.

बिहार पोलिसांनी सुशांतच्या बँक खात्याची माहिती मिळवली. सुशांतचे वांद्र्याच्या कार्टर रोडवर असलेल्या कोटक बँकेच्या शाखेत खातं आहे. बिहार पोलिसांनी कोटक बँकेच्या अधिकाऱ्यांकडून सुशांतचे गेल्या तीन फायनान्शियल वर्षाचे स्टेटमेंट मिळवले. सुमारे दोन तास त्या ठिकाणी त्यांचा तपास चालला.

बिहार पोलिसात जो गुन्हा दाखल आहे, त्यात सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये गायब असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या कागदपत्रांची त्यांना तपासकामी मदत होईल.

बिहार पोलिसांनी मुंबईत तपासाचा धडाका लावला आहे. कोणत्या मुद्यांवर तपास करायचा, हे त्यांनी निश्चित करुन ठेवले आहे. सुशांतचा आर्थिक व्यवहार, सुशांतच्या मृत्यूचे कारण सांगणारे साक्षीदार शोधणे आणि रियाच्या विरोधातील साक्षीदार शोधणे या तीन मुद्यांवर ते तपास करत आहेत.

हेही वाचा : रियासोबत सुशांतच्या बहिणीचा वाद, पाटणा पोलिसांच्या चौकशीत माहिती

बिहार पोलिसांनी सुशांतची एकेकाळची मैत्रीण अंकिता लोखंडे हिचा जबाब नोंदवला. सुमारे पाऊण तास जबाब नोंदवण्याचं काम चाललं. सुशांत शेवटच्या काळात अंकिता लोखंडे हिच्या संपर्कात होता. यावेळी ते व्हाॅट्सअ‍ॅप, फोनद्वारे संपर्कात होते. यावेळी सुशांतने रियाच्या विरोधात अंकिताला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. हे सर्व पुरावे या जबाबात बिहार पोलिसांनी घेतले आहेत. बिहार पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात अंकिता लोखंडे महत्त्वाची साक्षीदार होणार आहे.

सुशांतसिंहच्या खात्यातून 15 कोटी रुपये गायब झाले आहेत. हे पैसे रिया चक्रवर्ती हिने गायब केल्याचा आरोप आहे. 15 कोटी ही मोठी रक्कम आहे. त्याचप्रमाणे सुशांतने आणखी काही कंपन्या काढल्या होत्या. यानंतर या खात्यावर कोट्यवधी रुपये आले होते. आता या पैशाचा अपहार झाल्याचं म्हटलं जात आहे. एका महिन्यात हे पैसे गायब झाले आहेत. यामुळे आता या प्रकरणात ईडी देखील लक्ष घालणार आहे. ईडीही तपास करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बिहार पोलीस तपासात सक्रिय झाले असताना आता मुंबई पोलीस मात्र शांत झाले आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही, तोपर्यंत कोणाला चौकशीसाठी बोलवायचं नाही, असा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे.

खरं तर मुंबई पोलिसांचं प्रकरण वेगळं आहे आणि बिहार पोलिसांचं प्रकरण वेगळं आहे. मुंबई पोलीस आत्महत्येचा तपास करत आहेत, तर बिहार पोलिसांनी थेट त्याला आत्महत्येस कारणीभूत ठरल्याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलीस यांच्याकडे कोणतीही दखलपात्र कलम नाहीत, तर बिहार पोलिसांनी गंभीर अशी दखलपात्र, कलम लावून तपासात आघाडी घेतली आहे. यामुळे नाईलाजास्तव मुंबई पोलिसांनी आता गप्प बसण्याशिवाय पर्याय उरला नाही.

संबंधित बातम्या :

 पाटणा पोलीस कोटक बँकेत, तपास CBI नव्हे तर मुंबई पोलिसांकडेच

 रियाने सुशांतला खूप त्रास दिला, अंकिता लोखंडेचा धक्कादायक जबाब, व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा दाखला

सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बिहार पोलीस मुंबईत, रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिन अर्जाच्या तयारीत

(Bihar Police records Actress Ankita Lokhande statement in Sushant Singh Rajput Death Case)

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.