AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वेटलॉस’साठी ‘खादाडी’वर नियंत्रण कसं मिळवाल?

कोरोनाच्या टाळेबंदीत कदाचित तुम्ही तणावाखाली असाल किंवा कंटाळले असाल आणि मग तुम्हाला वाटतं की, काहीतरी खाऊया, सहजच सोफ्यावर बसल्या बसल्या किंवा नेटफ्लिक्सवर एखादा सिनेमा पाहताना (Binge Eating harmful for health) खाऊया.

'वेटलॉस’साठी ‘खादाडी’वर नियंत्रण कसं मिळवाल?
मसालेदार अन्न केवळ नुकसानदायीच नाही! हे फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित
| Edited By: | Updated on: May 15, 2020 | 2:50 PM
Share

कोरोनाच्या टाळेबंदीत कदाचित तुम्ही तणावाखाली असाल किंवा कंटाळले असाल आणि मग तुम्हाला वाटतं की, काहीतरी खाऊया, सहजच सोफ्यावर बसल्या बसल्या किंवा नेटफ्लिक्सवर एखादा सिनेमा पाहताना (Binge Eating harmful for health) तुम्हाला काहीतरी खाऊसे वाटते. कारण कंटाळा घालवण्यासाठी वेफर्सचं पाकिट उघडून वेफर तोंडात टाकण्यासारखी या जगात दुसरी कोणती सोपी गोष्टच नाही! खरं ना?

सुरुवातीला तुम्हाला वाटतं, एखाद-दुसरा वेफर खाऊया. पण नंतर तुम्ही आणखी वेफर खातच जाता. अगदी ते पाकिट संपेपर्यंत. कदाचित आइस्क्रिमबाबतही हेच होत असेल. तुम्हाला माहित असतं की, या खादाडीमुळे तुम्हाला उद्या कदाचित फिट वाटणार नाही, तब्येत थोडीशी बिघडू शकते, तरीही तुम्ही खाणं थांबवत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही उठता तेव्हा तुमचं पोट टम्म फुगलेलं असतं!

हे सगळं वर्णन जर तुम्हाला लागू होत असेल तर तुम्ही तुमच्याच ‘बकासुरी आस्वाद’ घेण्याच्या प्रवृत्तीचे म्हणजे ‘खादाडीचे शिकार’ झालेले आहात. इंग्रजीत याला ‘बिंज इटिंग’ म्हणतात. घरबसल्या केली जाणारी ही खादाडी निश्चितच तुमच्या आरोग्यासाठी चांगली नाही. ती कशी रोखता येईल किंवा तिच्यावर नियंत्रण कसं मिळवता येईल, यासाठी काही टिप्स-

1. नेहमी आरोग्यदायी जेवण घ्या. शरीराला आवश्यक इतके अन्नपदार्थ तुम्ही खाल्ले नाहीत, कमी जेवून पोट मुद्दामहून रिकामं ठेवलं तर खाण्याची इच्छा होणारच. याचं पर्यवसान शेवटी जास्त खाण्यात होऊ शकतं.

2. भरपूर पाणी प्या. दिवसभरात भरपूर पाणी पिणं हा सतत भूक लागण्यावरचा सर्वात सोपा आणि तरीही अत्यंत परिणामकारक असा उपाय आहे. त्यामुळे अतिखाण्याची इच्छा रोखली जाते.

3. भाज्या आणि फळं जास्त खा. भाज्या आणि फळांमध्ये फायबर- तंतू असतात. हे तंतू पचन मार्गातून हळूहळू जातात आणि त्यामुळे तुम्हाला अधिक काळ ‘भरपेट’ ठेवतात.

4. जेवण एकदाही चुकवू नका. नाश्ता असो की दुपारचं किंवा रात्रीचं जेवण, कोणतंही जेवण टाळल्यामुळे भूक वाढते आणि परिणामी तुम्ही अनहेल्दी फूड खाऊन बसता. तुमच्या ठरलेल्या वेळेला जेवत जा.

5. प्रथिनांचं सेवन वाढवा. उच्च प्रथिनयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला अधिक काळ ‘भरपेट’ वाटेल आणि त्यामुळे अर्थातच भूक नियंत्रणात राहील.

6. खाण्याबाबत तुमचं नियंत्रण नेमकं का सुटतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कंटाळा आल्यावर खाताय की, तणावग्रस्त झाल्यामुळे की आणखी एखाद्या भावनिक कारणामुळे? एकदा का हे तुम्हाला कळलं की मग तुम्हाला त्यादृष्टीने एखादा कृतीशील कार्यक्रम आखता येईल. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट कारणामुळे किंवा विशिष्ट वेळी मला भूक लागते. मग अशा वेळी काहीही अरबट चरबट खाण्यापेक्षा मी आरोग्यदायी पदार्थच खाईन.

7. खादाडीची इच्छा निर्माण झालीच तर वेफर- केक- चॉकलेट- आइस्क्रीम असे पदार्थ खाण्यापेक्षा आरोग्यदायी पदार्थ खा. ‘खादाडी’ला पर्याय ठरु शकतील असे काही चांगले पर्याय मी इथे देत आहे- केळी, साधे दही, पॉपकॉर्न, डार्क चाकलेट (70 टक्के कोकोआ), तुमच्या आवडीचं कोणतंही फळ, अंड (पिवळं बलक सोडून), ब्राऊन ब्रेड व्हेज किंवा एग सॅंडविच, ओट्स, प्रोटीन बार किंवा प्रोटीन शेक, स्प्राऊट चॅट, दूध, व्हेजिटेबल किंवा चिकन सूप, सलाड (काकडी, गाजर, टोमॅटो), मल्टीग्रेन खाकरा.

(डॉ. स्नेहल अडसुळे या न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशिअन असून ‘वूमन मेटाबोलिझम डाएट’ यातील तज्ज्ञ आहेत.)

(टीप – लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.