विषप्रयोग केल्याने सुशांतचे शवविच्छेदन उशिरा, सुब्रमण्यम स्वामींचा गंभीर आरोप

अनिश बेंद्रे

|

Updated on: Aug 25, 2020 | 10:51 AM

सुशांतच्या शरीरातील विष पाचक द्रवपदार्थात ओळखले जाण्यापलिकडे विरघळतील, यासाठी शवविच्छेदन हेतुपुरस्सर उशिरा केल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला

विषप्रयोग केल्याने सुशांतचे शवविच्छेदन उशिरा, सुब्रमण्यम स्वामींचा गंभीर आरोप
Follow us

मुंबई : एकीकडे सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय तपासाला वेग आलेला असतानाच भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गंभीर आरोप केला आहे. सुशांतवर विषप्रयोग झाल्याने त्याची ऑटोप्सी (शवविच्छेदन) जाणीवपूर्वक उशिरा केली, असा दावा स्वामींनी केला. (BJP MP Subramanian Swamy claims Sushant Singh Rajput was poisoned)

“आता मारेकऱ्यांची राक्षसी मानसिकता आणि त्यांची मजल कुठवर गेली, हे हळूहळू उघडकीस येत आहे. शवविच्छेदन हेतुपुरस्सर उशिरा केले गेले. ज्यामुळे सुशांतसिंह राजपूतच्या शरीरातील विष पोटातील पाचक द्रवपदार्थात ओळखले जाण्याच्या पलिकडे विरघळतील. जे जबाबदार आहेत त्यांना पकडण्याची वेळ आली आहे” असे ट्वीट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

सुशांतसिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, सुशांतचा स्वयंपाकी नीरज, सुशांतसिंह राजपूतचा चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांना सांताक्रूझमधील डीआरडीओ गेस्ट हाऊसला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.  सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय टीम तिथे थांबली आहे. याआधी मुंबई पोलीसही या ठिकाणी दाखल झाले आहेत.

संबंधित बातम्या :

रियाकडून सुशांतवर आध्यात्मिक उपचार, सीबीआय पंडित, पुजारी तांत्रिक-मांत्रिकांचीही बाजू तपासणार

दिशा सालियानच्या मृत्यूनंतर तिच्या मोबाईलवरुन इंटरनेट कॉलिंग, कॉल नेमके कोणी केले? तपास नाही

(BJP MP Subramanian Swamy claims Sushant Singh Rajput was poisoned)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI