वाढीव वीजबिलाविरोधात भाजप आक्रमक; कुडाळमध्ये महावितरण कार्यालयावर कार्यकर्त्यांचे आंदोलन

वाढीव वीजबिलाच्या प्रश्नावरुन जिल्ह्यातील भजप कार्यकर्त्यांनी कुडाळ येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

वाढीव वीजबिलाविरोधात भाजप आक्रमक; कुडाळमध्ये महावितरण कार्यालयावर कार्यकर्त्यांचे आंदोलन
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 3:51 PM

सिंधुदुर्ग : वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन जिल्ह्यातील भजप कार्यकर्त्यांनी कुडाळ येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परिस्थिती जास्त चिघळू नये म्हणून नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. (BJP march against electricity bill issue)

वाढीव वीजबिलावमध्ये सूट देण्याच्या आश्वासनावरुन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घूमजाव केल्यानंतर राज्यात नागरिकांत नाराजी आहे. भाजप नेत्यांकडूनही महाविकास आघाडीवर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, कुडाळ येथील भाजप कार्यकर्त्यांनीही सरकाकरच्या वीजबिलाविषयीच्या धोरणाविरोधात महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकावरविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, कोरोनाकाळात आलेल्या वाढीव वीजबिलात सवलत मिळावी अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनाचे नेतृत्व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली केले.

यावेळी, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे नागरिक आधीच आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. त्यात वाढीव वीजबिलामुळे जनतेची आर्थिक लूटमार होत आहे. त्यामुळे नागरिकांना वीजबिलात सवलत मिळालीच पाहिजे. वीजबिल न दिल्यामुळे जिल्ह्यातील कोणाचीही वीज कापण्यात येऊ नये. अशी मागणी भाजपने केली. तसेच, महावितरण प्रशासन ऊर्जामंत्र्यांच्या आदेशाने मनमानी करत आहे.विजबिले भरण्यासाठी सक्तीचे राबवलेले धोरण या जिल्ह्यात चालू देणार नाही, असा इशाराही भाजपने दिला आहे.

वीजबिल कमी करा, अन्यथा आंदोलन : मनसे

वीजबिल माफी देता येणार नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केल्यानंतर मनसेने वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. वीजबिलात माफी देण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने राज्यातील साडे अकरा कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे जनतेत संतापाची भावना असून  सोमवारपर्यंत बील माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्या जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज दिला.

संबंधित बातम्या :

वाढीव वीजबिलांच्या विरोधात मनसे रस्त्यावर, अविनाश जाधवांचा थेट ऊर्जामंत्र्यांना इशारा

सामान्यांना वीजबिलाचा ‘शॉक’, ठाकरे सरकार दिलासा देणार? मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक

राज ठाकरेंच्या वीजबिल माफीच्या आंदोलनात भाजपही; बावनकुळेंचं मोठं विधान

(BJP march against electricity bill issue)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.