Sushant Singh Rajput | गळ्यावर दोरीचा व्रण, सुसाईड नोट नाही, सुशांतच्या आत्महत्येचं प्राथमिक कारण पोलिसांनी सांगितलं!

सुशांत गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली असल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

Sushant Singh Rajput | गळ्यावर दोरीचा व्रण, सुसाईड नोट नाही, सुशांतच्या आत्महत्येचं प्राथमिक कारण पोलिसांनी सांगितलं!

Sushant Singh Rajput Suicide मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या (Sushant Singh Rajput Suicide Reason) करत स्वत:चं जीवन संपवलं. सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सुशांत गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली असल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे ((Sushant Singh Rajput Suicide Reason).

प्राथमिक माहितीनुसार, सुशांतने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्येनंतर समोर आलेल्या फोटोतही त्याच्या गळावरील व्रण स्पष्ट दिसत आहेत. त्याच्या आसपासच्या लोकांची, मित्रांची पोलिसांनी चौकशी केली. प्राथमिक चौकशीत तणावाखाली येऊन त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्याच्या आत्महत्येमागे मानसिक तणाव हे कारण समोर आलं आहे. मात्र, कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट अद्याप पोलिसांना सापडलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.

सुशांतने हे टोकाचं पाऊल का उचललं?

आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेले अनेक दिवस सुशांत हा मानसिक तणावाखाली होता. त्याची मैत्रिण रिया आणि तो नीवन फ्लॅट शोधत होते. त्याला नवीन फ्लॅट हवा होता. त्यानंतर तो या वांद्र्याच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला होता. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत या फ्लॅटमध्ये एकटाच राहात होता.

एक दोन दिवसात डिप्रेशन येत नाही. गेले काही दिवस तो तणावाखाली असल्याचं त्याच्या जवळच्या मित्रांनी सागितलं. त्यामुळे तो कुठल्या डॉक्टरकडून उपचार घेत होता, त्याला कशाचं डिप्रेशन होतं, त्याचे मेडिकल डॉक्युमेंट वगैरे सापडतात का, या सर्वांचा पोलीस शोध घेत आहेत.

इतक्या मोठ्या अभिनेत्याने आत्महत्या केली, तर त्यामागील कारण काय, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्याने तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याचं कारण सध्या समोर आलं आहे. सध्यातरी त्याच्या मित्रांच्या चौकशीतून डिप्रेशन हेच कारण मिळालं आहे, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

सुशांत सिंह राजपूतची कारकीर्द

जन्म – 21 जानेवारी 1986

स्टार प्लसच्या ‘किस देश में है मेरा दिल’ मालिकेतून पदार्पण

2009 मध्ये आलेल्या पवित्र रिश्ता मालिकेतून तुफान लोकप्रियता मिळाली.

2013 मध्ये सिनेविश्वात पदार्पण

काय पो छे पहिला हिंदी चित्रपट, सिनेमातील अभिनयासाठी फिल्मफेयरसाठी नामांकन

2016 मध्ये एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी चित्रपट तुफान गाजला

Sushant Singh Rajput Suicide Reason

चित्रपट

 • काय पो छे
 • शुद्ध देसी रोमान्स
 • पी के
 • डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी
 • एम एस धोनी – द अनटोल्ड स्टोरी
 • राबता
 • वेलकम टू न्यूयॉर्क
 • केदारनाथ
 • सोन चीरिया
 • शेवटचा थिएटरमध्ये रिलीज झालेला – छिछोरे
 • ड्राईव्ह नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला ड्राईव्ह

Sushant Singh Rajput Suicide Reason

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput | सुशांतपूर्वी आत्महत्या केलेले कलाकार, दिग्गजांच्या Suicide ने बॉलिवूड शोकसागरात

Sushant Singh Rajput | अब शहर भर जिक्र मेरी खुदकुशी का.. संजय राऊत-उद्धव ठाकरेही हळहळले

Sushant Singh Rajput suicide | सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त धोनी पचवू शकेल का? धोनीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा

Sushant Singh Rajput | चार दिवसापूर्वी मॅनेजरची इमारतीवरुन उडी, आज सुशांतचा गळफास

Published On - 5:28 pm, Sun, 14 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI